इरफानने आपल्या अभिनयाची मोहिनी त्याने सर्वांवर टाकली होती. आपल्या अभिनाने त्याने अनेकांची मने जिंकली होती. फक्त बॉलीवूडच नव्हे, तर हॉलीवूडमध्येही त्याचे नाव आदराने घेतले जात होते. पण अखेर आज इरफानची प्राणज्योत आज अखेर मालवली. इरफान हा अभिनेता म्हणून काय होता, हे तुम्हाला सांगायलाच नको, पण त्याला क्रिकेटपटू व्हायचे होते. तो चांगला क्रिकेट खेळायचा. पण इरफानचे क्रिकेटर व्हायचे स्वप्न अखेर अधुरेच राहिले. पण बॉलीवूडमध्ये काम करत असतानाही इरफान हा क्रिकेटबद्दल बोलत असायचा, त्याचबरोबर क्रिकेट खेळत असतानाचा त्याचा एक फोटो चांगलाच व्हायरलही झाला होता.
इरफानचे कर्करोगाने निधन झाल्याचे वृत्त आहे. युवराजलाही २०११ साली कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर युवराजने परदेशात जाऊन कर्करोगावर उपाचार घेतले आणि तो पुन्हा एकदा मैदानात परतला होता. त्यामुळे इरफानला झालेल्या वेदना मी समजू शकतो, असं म्हणत युवराज भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
इरफान खानला न्यूरोएण्डोक्राइन ट्यूमरचा आजार होता. लंडनमध्ये त्याच्यावर काही काळ उपचारही सुरू होते. तब्येतीत सुधारणा आल्यानंतर तो भारतात परतला होता. मात्र पुन्हा दोन दिवसांपासून त्याची प्रकृती खालावली अन् कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात इरफानने अखेरचा श्वास घेतला आहे. बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या निधनावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह क्रिकेट विश्वातील खेळाडूंनी शोक व्यक्त केला. बॉलीवूडमध्ये काम करतानाही इरफानचे क्रिकेटवरील प्रेम कधीही कमी झाले नव्हते.
इरफानच्या निधनाच्या वृत्तावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली,
, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, अनिल कुंबळे, आर.अश्विन, मोहम्मद कौफ आणि सुरैश रेना यांनी शोक व्यक्त केला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times