सध्याचा जमाना हा क्रिकेट लीगचा आहे. त्यामुळे देशभरात क्रिकेटच्या लीग सुरु आहे. भारतातील आयपीएल सुपर हिट ठरल्यानंतर बऱ्याच देशांनी क्रिकेटची लीग सुरु केली. पण आता भारताच्या एका संघ मालकावर आयसीसीने बंदी घातल्याचे वृत्त आहे.

भारतातील एका व्यावसायिकाने क्रिकेट लीगमधील एक संघ विकत घेतला होता. हा संघ मालक भ्रष्टाचारविरोधी एका तपासामध्ये बाधा आणत होता. ही गोष्ट या संघमालकानेही स्वीकार केली आहे. त्यामुळेच आता त्याच्यावर आयसीसीने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

या संघमालकाने एका अज्ञात व्यक्तीबरोबर भ्रष्टाचार केला, असे आयसीसीचे म्हणणे आहे. त्याचबरोबर हा भ्रष्टाचार केल्यानंतर या संघ मालकाने त्या अज्ञात व्यक्तीला दोघांमधील संभाषणाचे पुरावे नष्ट करण्याबाबत सांगितले. त्याचबरोबर जेव्हा आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी पथक तपास करणार होते, त्यापूर्वीच या संघ मालकाने या अज्ञात व्यक्तीचा नंबरही आपल्या मोबाईलमधून डिलीट केला आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचा तपास करण्यापूर्वी या संघ मालकाने सर्व पुरावे नष्ट केल्याचे आयसीसीने म्हटले आहे. आता या संघ मालकावर सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत बंदी येऊ शकते.

हा संघ मालक आहे कोण…भारतातील व्यावसायिक दीपक अगरवाल असे या संघ मालकाचे नाव आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये २०१८ सालापासून टी-१० ही क्रिकेटची लीग सुरु करण्यात आली होती. या लीगमधील एक संघ दीपक अगरवालने विकत घेतला होता. या लीगची मालकी असताना दीपकने हा भ्रष्टाचार केला असल्याचे म्हटले जात आहे. भ्रष्टाचाराच्या तपासाला मदत न करणे, पुरावे नष्ट करणे, असे आरोप आयसीसीने दीपकवर लावलेले आहेत.

आयसीसीने काय म्हटले आहे…आयसीसीचे महाप्रबंधक अॅलेक्स मार्श यांनी याबाबत सांगितले की, ” आयसीसी जो भ्रष्टाचाराचा तपास करत होती, त्यामध्ये दीपक यांनी बाधा आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर या तपासामध्ये विलंब कसा होईल, हेदेखील दीपक यांनी जाणीवपूर्वक केले. या गोष्टी फक्त एकदाच नाही तर वारंवार त्यांनी केल्या आहेत. या साऱ्या गोष्टीचा त्यांनी स्वीकारही केला आहे. सध्याच्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे आणि त्यांच्या
कडून मदतीची अपेक्षा आम्ही करत आहोत. या साऱ्या प्रकरणी त्यांना काय शिक्षा करायची, याचा विचारही सुरु आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here