बॉलीवूडचा अष्टपैलू अभिनेता इरफान खानचे आज निधन झाले. पण इरफानबद्दलच्या काही गोष्टी अजूनही लोकांना माहिती नाहीत. इरफान खरंतर क्रिकेटपटू होणार होता. पण एका प्रसंगानंतर इरफानने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याने त्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. नेमका कोणता प्रसंग इरफानच्या बाबतीत घडला होता…

राजस्थानमध्ये इरफानचा जन्म झाला. तो शाळेत चांगला क्रिकेट खेळायचा. इरफानच्या फलंदाजीवर बरेच जण फिदा होते. इरफानच्या घराच्या बाजूला एक चौगान नावाचे स्टेडियम होते, तिथे इरफान जाऊन क्रिकेट खेळायचा. इरफानला क्रिकेटमध्ये रस होता. इरफानची फलंदाजी फक्त शाळेपुरताच नव्हती, तर त्याला क्रिकेटमध्ये चांगली गती होती. त्यामुळेच त्याची निवड एका मोठ्या स्पर्धेसाठी होणार होती. इरफान हा एक चांगला क्रिकेटपटू होता. त्यामुळेच भारतामध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या सी. के. नायडू चषकासाठी इरफानची निवड पक्की समजली जात असल्याचे वृत्त होते. इरफान त्यावेळी ही स्पर्धा खेळण्यासाठी तयारही होता.

ही स्पर्धा खेळण्यासाठी इरफानला त्यावेळी सहाशे रुपयांची गरज होती. आता हे पैसे कोणाकडे मागायचे, हा प्रश्न त्याला पडला होता. घरच्यांकडे हे पैसे तो मागू शकत नव्हता आणि त्याला कोणी मदतही करत नव्हते. त्यामुळे फक्त सहाशे रुपये नसल्याची खंत इरफानला त्याप्रसंगी वाटली आणि या प्रसंगांतर इरफानने क्रिकेटपटू बनण्याचा नाद सोडून दिला.

घरात गरिबी असल्यामुळे आपल्याला पुढे क्रिकेट खेळता येणार नाही, हे इरफानला कळून चुकले होते. त्यामुळे इरफानने क्रिकेटचा नाद सोडून दिला. इरफानने जर क्रिकेट सुरु ठेवले असते, तर भारताला एक चांगला क्रिकेटपटू मिळू शकला असता, असेही काही जणं म्हणतात. इरफान नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये गेला आणि त्यानंतर आपल्याला एक दमदार अभिनेता पाहायला मिळाला. पण बॉलीवूडमध्ये आल्यावरही इरफानचे क्रिकेटप्रेम कधीही कमी झाले नाही. इरफानचे क्रिकेटपटूंबरोबर चांगले संबंध होते. त्यामुळे इरफानच्या निधनानंतर क्रीडा विश्वही हळहळले आणि क्रीडापटूंसह संघटनांनीही त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. बॉलीवूडमध्ये काम करतानाही इरफानने क्रिकेट खेळणे सोडले नव्हते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here