सध्याच्या घडीला देशात करोनामुळे चिंतेचे वातावरण आहे. घरात राहून बरीच लोकं ग्रासलेली आहे. या परिस्थित काही तरी भन्नाट करण्याचा चंग एका खेळाडूने बांधला. घरामध्ये व्यायाम करताना हा भारताचा खेळाडू सपना चौधरीच्या गाण्यावर धम्माल डान्स करत असताना पाहायला मिळाला. आता या खेळाडूचा हा डान्सचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला आहे.

करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला भारतामध्ये लॉकडाऊन सुरु आहे. हे लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून भारताचे खेळाडू आपल्या घरातच आहेत. या कालावधीमध्ये त्यांनी घरात राहून व्यायाम सुरु ठेवला आहे. कारण ज्यावेळी क्रीडा स्पर्धा सुरु होतील, तेव्हा आपण पूर्णपणे फिट राहायला हवे, असे त्यांना वाटत आहे.

भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया हा घरामध्ये व्यायाम करतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये बजरंग सपना चौधरीच्या एका गाण्यावर डान्स करत आहे. हे गाणे हरयाणामध्ये भरपूर प्रसिद्ध झाले असून ‘तू चीज बड़ी है’ अशा या गाण्याच्या ओळी आहेत. या गाण्यावर बजरंगने धम्माल डान्स केला आहे. त्याचा हा व्हिडीओ युनायडेट वर्ल्ड रेसलिंगने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

बजरंग हा भारताचा एक चांगला कुस्तीपटू आहे. त्याच्याकडून आगामी ऑलिम्पिकमधून भारताला पदकाी आशा आहे. भारताने गेल्या काही ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये कुस्तीपटूंचा वाटाही मोलाचा आहे. यापूर्वी सुशील कुमार आणि योगेश्वर दत्त या कुस्तापटूंनी भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकवून दिले आहे. आता त्यांच्या नंतर हा वारसा बजरंग चालवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

बजरंग हा ६५ किलो वजनी गटात कुस्ती खेळतो. आतापर्यंत काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बजरंगने चांगली कामगिरी केली आहे. सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे परिस्थिती वाईट आहे. परिस्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा एकदा स्पर्धा सुरु होतील. या स्पर्धांसाठी आपण फिट राहावे, यासाठी बजरंग आपल्या घरामध्येच व्यायाम करत असल्याचे दिसत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here