भारतीय संघात २००७ मध्ये स्थान मिळाल्यानंतर मधळ्या फळीत खेळत होता. पण भारताचा तत्कालीन कर्णधार महेंद्र सिंह धोनीने रोहितची सलामीवीर म्हणून क्षमता ओळखली आणि त्याला संधी दिली. धोनीच्या या एका निर्णयामुळे रोहितचे करिअरच बदलले आणि तो स्टार झाला.
वाचा-
भारतीय संघाकडून सलामीवीर म्हणून मैदानात उतरण्याआधी रोहित क्रमांक तीन ते सात या दरम्यान फलंदाजी केली होती. पण तो फार यशस्वी झाला नव्हता. त्यामुळेच धोनीने रोहितला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला.
वाचा–
धोनीने रोहितला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन येथे २०११ साली सलामीवीर म्हणून संधी दिली. तेव्हा रोहितने मालिकेत २३,१ आणि ५ अशा धावा केल्या. त्यानंतर रोहितला पुन्हा पाचव्या क्रमांकावर पाठवण्यात आले. दोन वर्ष खालच्या क्रमांकावर खेळल्यानंतर धोनीने रोहितला पुन्हा एकदा सलामीवीर म्हणून संधी देण्याचे ठरवले. या दुसऱ्या संधीचा मात्र रोहितने फायदा घेतला आणि अनेक ऐतिहासिक खेळी केल्या.
वाचा-
२०१३ साली धोनीने इंग्लंडविरुद्ध रोहितला सलामीवीर म्हणून पाठवले. रोहितने पहिल्याच सामन्यात ८३ धावा केल्या. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत त्याने दोन अर्धशतक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ ही द्विशतकी खेळी केली. रोहितची बॅट चालली आणि तो भारतीय संघाचा नियमीत सलामीवीर झाला.
वाचा-
रोहितने सलामीवीर म्हणून १२८ सामने खेळले आहेत. पहिल्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने ५ हजार ५२७ धावा केल्या. तर दुसऱ्या क्रमांकावर १ हजार ६२१ धावा. रोहितने सलामीवीर म्हणून आतापर्यंत ३ द्विशतक आणि २७ शतक केली आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times