मुंबई: ‘गॉड ऑफ क्रिकेट’ आणि ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यांच्यातील लढत नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी जलद गोलंदाज ब्रेट लीने शेन वॉर्नविरुद्ध नेहमची सचिन जिंकायचा असे म्हटले होते. आता भारताच्या व्हीव्हीएस लक्ष्मणने सचिन विरुद्ध वॉर्न यांच्या एका लढतीचा किस्सा सांगितला आहे.

वाचा-
चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर १९९८मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना झाला होता. भारतीय संघाने पहिल्या डावात २५७ धावा केल्या. सचिन फक्त ४ धावांवर बाद झाला. या सामन्यासाठी सचिनने खुप तयारी केली होती. पहिल्या डावात सचिनने शेन वॉर्नच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला आणि मग दुसऱ्या चेंडूवर तो मार्क टेलरच्या हाती झेलबाद झाला. मैदानातून परतल्यानंतर सचिनने स्वत:ला फिजओच्या रुममध्ये बंद केले आणि तो एक तास बाहेर आला नाही. सचिन जेव्हा रुममधून बाहेर आला तेव्हा त्याचे डोळे लाल झाले होते. तो प्रचंड भावनिक झाला होता. ज्या पद्धतीने तो बाद झाला. त्यावर तो नाराज होता.

वाचा-
लक्ष्मण म्हणाला, पण दुसऱ्या डावात सचिनने डावच बदलला. शेन वॉर्नच्या क्रीझचा वापर करत त्याने मिड ऑफ आणि मिड ऑनवर चेंडू मारले. वॉर्न विरुद्धची ही सर्वोत्तम खेळी होती. त्याने दुसऱ्या डावात १९१ चेंडूत १४ चौकार आणि ४ षटकारांसह १५५ धावा केल्या. वॉर्न दुसऱ्या डावात १२२ धावा देत १ विकेट घेता आली.

वाचा-
मार्ट टेलरच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३२८ धावा केल्या आणि ७१ धावांची आघाडी घेतली. भारताने सचिनच्या शतकाच्या जोरावर दुसऱ्या डावात ४ बाद ४१८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव १६८ धावात संपुष्ठात आला आणि भारताने हा सामना १७९ धावांनी जिंकला.

सचिनने या सामन्यात वॉर्नच्या गोलंदाजीवर भरपूर धावा केल्याचे लक्ष्मणने सांगितले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here