शतकवीर सूर्यकुमार एकटा लढला, पण…

सूर्यकुमार यादव एकटा इंग्लंडच्या गोलंदाजांपुढे लढत होता. सूर्यकुमारने यावेळी धडाकेबाज शतकही झळकावले. पण सूर्यकुमारला अन्य फलंदाजांची चांगली साथ लाभली नाही आणि त्यामुळेच भारताला पराभव पत्करावा लागला. इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी २१६ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने रिषभ पंत, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची विकेट लवकर गमावली. पण त्यानंतर सूर्यकुमारने शतक झळकावले, पण तो भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. इंग्लंडने या सामन्यात भारतावर १७ धावांनी विजय साकारला. या पराभवामुळे भारताच्या विजयी रथाला ब्रेक लागला आहे. सूर्यकुमार यादवने यावेळी ५५ चेंडूंत तब्बल १४ चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ११७ धावांची अफलातून खेळी साकारली. पण सूर्यकुमारची ही एकाकी झुंज अपयशी ठरली. सूर्यकुमारचे हे ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले. सूर्यकुमारने ४८ चेंडूंत आपले शतक चौकारासह साजरे केले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times