बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे गुरुवारी सकाळी मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात निधन झाले. ऋषी कपूर हे क्रिकेटचे चाहते होते. त्यांचे क्रिकेटच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष होते. त्यामुळेच ऋषी कपूर यांनी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना एक सवाल विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर कोहली आणि शास्त्री यांच्याकडेही नव्हते.

गेल्या वर्षी जून महिन्यात इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळवला गेला. या विश्वचषकात जो भारतीय संघ निवडण्यात आला होता. त्यावर बऱ्याच जणांनी आश्चर्य व्यक्त केले होते. ऋषी कपूर यांनीही विश्वचषकाच्या संघ निवडीबाबत एक प्रश्न कोहली आणि शास्त्री यांना विचारला होता. पण या प्रश्नाचे उत्तर कोहली आणि शास्त्री यांच्याकडे नसल्याचे पाहायला मिळाले होते.

वाचा-

विश्वचषकाचा संघ निवडण्यात आल्यानंतर ऋषी कपूर यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटमधून ऋषी कपूर यांनी कोहली आणि शास्त्री यांना एक सवाल विचारला होता. ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, ” कोहली आणि शास्त्री, रीषभ पंतसारखा युवा खेळाडू विश्वचषकाच्या संघात क नाही?”

विश्वचषकाच्या १५ सदस्यीय संघात पंतला जागा देण्यात आली नव्हती. विश्वचषकादरम्यान जेव्हा सलामीवीर शिखर धवन आणि अष्टपैलू खेळाडू विजय शंकर हे दुखापतग्रस्त झाले तेव्हा पंतला संघात सामील करण्यात आले होते. पण विश्वचषकासाठी सुरुवातीला निवडण्यात आलेल्या संघात पंत नव्हता. त्यावेळी ऋषी कपूर यांनी कोहली आणि शास्त्री यांना याबाबत प्रश्न विचारला होता. पण या प्रश्नाचे उत्तर कोहली आणि शास्त्री यांच्याकडे नसल्याचे पाहायला मिळाले होते.

ऋषी कपूर यांच्या निधनावर क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंनी शोक व्यक्त केला. ऋषी कपूर यांचे गुरुवारी सकाळी मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात निधन झाल्याचे त्यांचे बंधू रणधीर कपूर यांनी सांगितले. कालच अभिनेता इरफान खानचे निधन झाले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here