ऋषी कपूर यांच्या निधनावर क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंनी शोक व्यक्त केला. ऋषी कपूर हे क्रिकेटचे चाहते होते. त्यांचे क्रिकेटवर बारकाईने लक्ष असायचे. त्यामुळेच ते क्रिकेटवर भाष्य करायचे. ऋषी कपूर यांचा स्वभाव हा मजेदार होता. बोलता-बोलता ते कधी कोणाची फिरकी घेतील, हे सांगता यायचे नाही. ऋषी कपूर यांनी तर एकदा संपूर्ण टीम इंडियाचीच फिरकी घेतल्याचे पाहायला मिळाले होते.

वाचा-

ऋषी कपूर यांनी संपूर्ण टीमची ज्या विषयावर फिरकी घेतली होती, तो विषयही मजेशीर होता. विश्वचषकासाठी भारताच्या संघाची निवड झाली होती. या निवडचा फोटो सर्वत्र पसरलेला होता. या फोटोवर ऋषी कपूर यांनी अशी काही कमेंट केली होती की, सर्वांनाच हसू आवरता आले नव्हते. पण या कमेंटमध्ये त्यांचे क्रिकेटवर किती बारकाईने लक्ष आहे, हेदेखील पाहायला मिळत होते.

ऋषी कपूर यांनी भारताच्या विश्वचषकाच्या संघाबाबत एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी विश्वचषकासाठी निवडलेल्या संघाचा फोटो वापरला होता. या फोटोखाली ऋषी कपूर यांनी लिहीले होते की, ” विश्वचषकाच्या संघात अशाच खेळाडूंना निवडण्यात आले आहे की, ज्यांची फक्त दाढी आहे. पण आपल्या जास्त क्रिकेटपटूंची दाढी का आहे? संजू सॅमसन हा दाढीविना स्मार्ट दिसतो, हे माझे निरिक्षण आहे.”

विश्वचषकाच्या संघात युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनची निवड होईल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण संजूची निवड विश्वचषकासाठी झाली नाही. त्यावेळी ऋषी कपूर यांनी आपल्या खास शैलीत ही टीका केली होती. ज्या लोकांना क्रिकेटचे ज्ञान आहे, त्याच व्यक्ती असे भाष्य करू शकतात, असे त्यावेळी म्हटले गेले होते. ऋषी कपूर यांना क्रिकेटचे चांगले ज्ञान होते. त्यामुळे त्यांनी एकदा भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना एक प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर कोहली आणि शास्त्री या दोघांनाही देता आले नव्हते.
वाचा-

ऋषी कपूर हे दिलखुलास होते. जे त्यांच्या मनात येईल ते स्पष्टपणे बोलून मोकळे व्हायचे. पण त्यांच्या बोलण्यात एक अभ्यास असायचा. बरीच वर्षे ते बॉलीवूडमध्ये होते. त्यामुळे त्यांच्या गाठिशी दांडगा अनुभव होता. त्याचबरोबर ऋषी कपूर यांना बोलण्यात कोणीही हरवू शकत नव्हते. त्यांचे बोलणे एकदा सुरु झाले की, ते ऐकत राहावेसे वाटायचे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here