वाचा-
अनेकदा सिनेस्टार सार्वजनिक ठिकाणी वादग्रस्त किंवा अडचणीत आणणाऱ्या विषयांवर बोलण्याचे टाळतात. पण ऋषी कपूर त्यापैकी नव्हते.
वाचा-
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंधामुळे दोन्ही देशातील सामने होत नाहीत. तसेच सारख्या स्पर्धेत देखील पाकिस्तानच्या खेळाडूंना खेळण्याची परवानगी नाही. पाकच्या खेळाडूंची आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा आहे. पण सरकार त्याला परवानगी देत नाही. अशातच एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर ऋषी कपूर यांनी पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंची बाजू घेतील होती.
वाचा-
तेव्हा ऋषी कपूर म्हणाले होते की,पाकच्या क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली पाहिजे. कारण अनेक पाकिस्तानी कलाकार बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. इतक नव्हे तर पाकमधील समालोचक आणि प्रशिक्षक देखील आयपीएलमध्ये आहेत. तर पाकिस्तानचे क्रिकेटपटू का खेळू नयेत.
वाचा-
ऋषी कपूर यांच्या या ट्विटमुळे पाकिस्तान क्रिकेटपटूंना आनंद झाला होता आणि ते त्यांच्यात लोकप्रिय झाले. इतकच नव्हे तर पाकिस्तानमधील माध्यमांनी त्यांचे कौतुक केले होते.
वाचा-
अर्थात पाकिस्तान क्रिकेटपटूंचे आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. कारण त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखी बिघडले. त्यामुळे फक्त क्रिकेटच नाही तर बॉलिवूडमधील पाक कलाकारांना माघारी परतावे लागले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times