वाचा-
प्रकृती खराब झाल्याने गोस्वामी यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज संध्याकाळी ५ वाजता त्यांचे निधन झाल्याचे कुटुंबियांनी सांगितले. गोस्वामी यांनी देशाला आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून दिले होते. तर १९६४च्या स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
वाचा-
ते मोहन बागान क्लबकडून खेळत असे. १९५७ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास सुरुवात केली. वयाच्या २७व्या वर्षी १९६४ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला.
वाचा-
फक्त फुटबॉलच नाही तर गोस्वामी क्रिकेटमध्ये देखील यशस्वी झाले होते. ते बंगाल संघाकडून रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळले होते. १९७१-७२ साली त्यांच्या नेतृत्वाखाली बंगाल संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. पण तेव्हाच्या बॉम्ब संघाने त्यांचा फायनल मध्ये पराभव केला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times