करोना व्हायरसमुळे देशभरात सर्व क्रीडा स्पर्धा ठप्प झालेल्या आहेत. सध्याच्या घडीला भारतात एकही क्रीडा स्पर्धा सुरु नाही. काही स्पर्धआ पुढए ढकलल्या गेल्या आहेत तर काही रद्द करण्यात आल्या आहेत. खेळाडूही आपल्या घरीच बसून आहेत. त्यामुळे आता स्पर्धा नाही, त्यामुळे मिळकत नाही. त्यामुळे बीसीसीआय आपल्या खेळाडूंना पगार देणार की त्यांचा पगार कापणार, हा सर्वात महत्वाचा प्रश्न असल्याचे म्हटले जात आहे.

बीसीसीआय ज्या स्पर्दा भरवते त्यासाठी प्रायोजक असतात. त्यामुळे स्पर्धा सुरु असताना बीसीसीआयला चांगला नफा मिळत असतो. पण सध्याच्या घडीला एकही क्रिकेट मालिका सुरु नाही. त्यामुळे त्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. या परिस्थितीत खेळाडूंचा पगार बीसीसीआय कापणार की चालू ठेवणार, याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना आहे.
वाचा-

बीसीसीआयच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा करार झालेला असतो. त्यामुळे त्यांना वर्षभराची रक्कम मिळत असते. पण जे स्थानिक स्तरावर खेळाडू खेळत असताना त्यांना सामन्यागणिक मानधन मिळत असते. सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे स्पर्धा रद्द झालेल्या आहेत. त्यामुळे आता या खेळाडूंना यापुढे कधी स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आणि कधी त्यांना मानधन मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्याच्या घडीला तरी बीसीसीआयने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला पाहायल मिळालेला नाही.

बीसीसीआयमधील क्रिकेट ऑपरेशन्सचे महाव्यवस्थापक आणि भारताचे माजी क्रिकेटपटू साबा करिम याबाबत म्हणाले की, ” याबाबत बीसीसीआयने अद्याप विचार केलेला नाही. जर स्पर्धा झाली नाही तर काय करायचे, हेदेखील अजून बीसीसीआयने ठरवलेले नाही. सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे आम्हाला जेव्हा स्पर्धा सुरु करायच्या असतील तेव्हा आम्ही सरकारला जरुर विचारू. त्यांच्या परवानगीनंतरच स्पर्धांना सुरुवात करणार आहोत.”
वाचा-

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेनंतर इराणी चषक स्पर्धा रद्द करावी लागली होती. आता बीसीसीआयचा स्थानिक हंगाम ऑगस्टमध्ये सुरु होणार आहे. पण करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला वातावरण चांगले नाही. त्यामुळे ऑगस्टपासून हंगामाला सुरुवात होणार की नाही, हे अजून सांगता येणार नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here