करोना व्हायरसमुळे सध्या भारतामध्ये लॉकडाऊन आहे. या गोष्टीचा फटका भारताच्या खेळाडूंनाही बसत आहे. या लॉकडाऊनमुळे भारताची ऑलिम्पिकमध्ये खेळणारी रीद्धी ही महिन्याभरापासून पुण्यात अडकली असल्याचे वृत्त प्रसारीत झाले आहे.

रीद्धी ही भारताच्या ऑलिम्पिकसाठी निवडण्यात येणाऱ्या तिरंदाजी संघात असू शकते. तिरंदाजीचा सराव करण्यासाठी रिद्धि आर्मी स्पोर्ट्स इंस्टीट्यूटमध्ये आली होती. येथे तिचा ऑलिम्पिकसाठीचा सराव सुरु होता. पण हे शिबीर संपल्यानंतर रिद्धी ही पुण्यामध्ये महिन्याभरापासून अडकली होती. आपल्याला घरी पोहोचवण्यात यावे, अशी विनंती रिद्धीने भारताच्या तिरंदाजी संघटनेला केली होती.

आपण सराव शिबीर संपल्यानंतरही महिन्या भरापासून पुण्यात अकडलेलो आहोत. माझी घरी जाण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती रिद्धीने भारतीय तिरंदाजी संघटनेला केली होती. तिरंदाजी संघटनेने यावर लगेच कार्यवाही सुरु केली आणि त्यांनी याबाबत क्रीडा मंत्रालयाला कळवले. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने ही गोष्ट रीद्धी राहत असलेल्या करनाल येथील जिल्हाधिकाऱ्यांना सांगितली आणि त्यांच्याकून परवानगी मागितली. या परवानगीनंतर अखेर एका महिन्याने रीद्धीला आपल्या घरी जाता आले.

रिद्धीला पुण्याहून आणण्यासाठी तिचे आई-वडिल गेले होते. पण लॉकडाऊनमुळे ते तिथेच अडकून पडले होते. अखेर आज त्यांना पुण्याहून करनालला जायला मिळाले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here