वेस्ट इंडिडजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलला काही दिवसांपूर्वी एक जोरदार धक्का बसला होता. एका क्रिकेट लीगच्या संघातून गेलची हकालपट्टी करण्यात आली होती. आता गेलला या संघातून का काढण्यात आले, याचे कारण समोर आले आहे.

गेल हा एक धडाकेबाज सलामीवीर आहे. पण गेल क्रिकेट व्यतीरीक्त बऱ्याच गोष्टींमध्ये अडकलेला आपल्याला पाहायला मिळतो. गेलचे राहणीमानही थोडे वेगळे आहे. गेलला नेमक्या कोणत्या कारणास्तव संघातून काढण्यात आले, हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना होती. कारण गेलने आपल्याला एका व्यक्तीच्या सांगण्यावरून संघातून काढून टाकले, असे म्हटले होते. या गोष्टीवर आता संघ मालकांनीच थेट खुलासा केला आहे. संघ मालकांनी एक पत्रक काढले असून त्यामध्ये आम्ही गेलला संघातून का काढले, हे सांगितले आहे.

गेल हा ज्या लीगमध्ये खेळत तहोता, त्या लीगमध्ये खेळताना त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नव्हती. त्याचबरोबर गेलचा संघहा लीगमध्ये अखेरच्या स्थानावर राहीला होता. या गोष्टीचा फटका गेलला बसला असल्याचे म्हटले जात होते.

गेल हा कॅरेबियन लीगमध्ये जमैका थलावा संघाकडून खेळत होता. या संघातून आता त्याला काढण्यात आले आहे. आपल्याला या संघातून संघाचे सहाय्यक प्रशिक्षक आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू रामनरेश सारवानमुळे काढले, असे गेलला वाटत होते. पण संघातून काढल्याचे हे कारण नसल्याचे संघाच्या मालकांनी स्पष्ट केले आहे.

जमैका थलावा संघाच्या मालकांनी याबाबत एक पत्रक काढले आहे. या पत्रकामध्ये गेलला का काढण्यात आले याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रकामध्ये म्हटले आहे की, ” गेलला संघातून रामनरेश सारवानमुळे काढले गेले ही गोष्ट निरर्थक आहे. कारण तहा आमचा निर्णय आहे. गेल्या हंगामात संघाकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली नाही. गेल्या वर्षी आमचा संघ हा गुणतालिकेत तळाला होता. त्यामुळे संघात काही बदल करण्याचे आम्ही ठरवले आहे. त्यानुसारच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. गेलला संघातून काढण्याचा निर्णय हा सर्वस्वी आमचाच आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here