नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये असे काही विक्रम असतात जे कोणत्याच संघाला अथवा खेळाडूला नकोसे असतात. पाकिस्तानचा संघ एकेकाळी जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम संघ मानला जात असे. पण सध्या कसोटी आणि वनडे मध्ये त्यांची कामगिरी अत्यंत खराब आहे. टी-२० प्रकारात पाकिस्तान संघाची कामगिरी काही प्रमाणात चांगली झाली आहे.

वाचा-
वनडे क्रिकेटचा विचार केल्यास पाकिस्तान संघाने १९९२ साली इम्रान खानच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर २०१७ मध्ये सरफराज अहमदच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तेव्हा पाकिस्तानने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पराभव केला होता. अर्थात या काही विक्रमांसोबत पाकिस्तानच्या नावावर क्रिकेटमधील सर्वात खराब असा विक्रम नोंदला गेला आहे.

वाचा-
वनडे क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या संघाचे फलंदाज सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याच्या क्रमवारीत पाकिस्तान अव्वल स्थानी आहे. आतापर्यंत पाकिस्तान संघातील फलंदाज ६५८ वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

वाचा-
या क्रमवारीत श्रीलंकेचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. लंकेचे फलंदाज ६२९ वेळा शून्यावर बाद झाले आहे. तिसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिज असून त्याचे फलंदाज ५९९ वेळा शून्यावर बाद झाले. चौथ्या स्थानावर टीम इंडिया, पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा क्रमांक लागतो.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेले संघातील फलंदाज
पाकिस्तान- ६५८
श्रीलंका- ६२९
वेस्ट इंडिज- ५९९
भारत-५९३
ऑस्ट्रेलिया-५५९
इंग्लंड- ५२८

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here