आज हिरक महोत्सवी महाराष्ट्र दिन आहे. पण सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे यावेळी महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. यावेळी भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सचिनने आपला एक खास फोटो शेअर केला आहे.

सचिनचे बरेच फोटो आपण सर्वांनी पाहिले आहेत. पण आज महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना सचिनने एक खास फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र दिनी सचिनच्या चाहत्यांना त्याचा खास फोटो पाहता येणार आहे. महाराष्ट्रात फेट्यांची परंपरा आहे. कोणत्याही शुभ कार्यात महाराष्ट्रामध्ये फेटा बांधला जातो. त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना सचिनने खास लाल रंगाचा फेटा बांधलेला फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्याचबरोबर सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

महाराष्ट्राची १ मे, १९६० रोजी निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, यासाठी मोठी चळवळ, आंदोलन करण्यात आले. आचार्य अत्र्यांसह अनेक दिग्गज मंडळींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि अखेर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आताच्या घडीला करोनाचे संकट महाराष्ट्रासह देशावर घोंगावत असल्यामुळे सर्वांनी घरीच राहून महाराष्ट्र दिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

आजच्या दिवशी म्हणजेच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झालं. सध्या करोना व्हायरसमुळे महाराष्ट्र दिनाचे मोठे सेलिब्रेशन करता आले नाही, पण मराठी सिनेसृष्टीतल्या कलाकार मंडळींनी देखील घरी राहून एक अभिमान गीत तयार केलं आहे. एका खास व्हिडिओच्या माध्यमातून मराठी सेलिब्रिटींनी चाहत्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. ‘बघतोस काय मुजरा कर’ या गाण्यातून मराठी सिनेसृष्टीतील २१ कलाकार मंडळींनी महाराष्ट्राविषयी त्यांचं प्रेम, आदर व्यक्त केला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here