रोहितचा काल ३३ वा वाढदिवस होता. पण त्याच्या या वाढदिवशी ऋषी कपूर यांचे निधन झाले. रोहितच्या वाढदिवसाच्या एका दिवापूर्वीच इरफान खान सर्वांना सोडून गेला होता. त्यामुळे संपूर्ण देश दु:खात होता.
रोहितने आज एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये रोहित म्हणाला की, ” मला शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार. माझ्यासााठी हा वाढदिवस कभी खूषी, कभी गम असाच होता. माझ्या मनात याबद्दल मिश्र भावना आहेत. आपण बॉलीवूडमधील दोन दिग्गज कलाकारांना मुकलो आहोत. त्यामुळे यापुढे सर्व परिस्थिती सामन्य व्हावी आणि आपल्या कुटुंबियांबरोबरचा काळ चांगला व्यतित व्हावा.”
रोहितने २०१५ साली रितिकाबरोबर लग्न केलं. पण हे लग्न जुळुन कसं आलं, या़बाबत बऱ्याच जणांना माहिती नाही. रितिका ही रोहितची व्यवस्थापक म्हणून काम करत होती. रोहितच्या सर्व नोंदी रितिका ठेवत होती. रोहित आणि रितिका हे दोघे एकमेकांना सहा वर्षांपासून ओळखत होते. त्यामुळे त्यांच्या आवडी-निवडी एकमेकांना माहिती होत्या. रितिका आणि रोहित यांच्यामध्ये मैत्रीचे एक चांगले नाते तयार झाले होते. कारण दोघे बराच काळ एकत्र असायचे. रोहितने या मैत्रीचे प्रेमात रुपांर करायचे ठरवले. त्यासाठी रोहितने फिल्मी अंदाजात रितिकाला प्रपोज केले होते.
रोहित हा बोरिवली स्पोर्ट्स सेंटर येथे खेळत मोठा झाला. या मैदानातच रोहितने रितिकाला गुडघ्यावर बसून प्रपोज केले होते. त्यावेळी रितिकानेही रोहितला होकार दिला होता. रोहितने साखरपुडा केला, पण त्याने जास्त कोणाला आमंत्रित केले नव्हते. ही गोष्ट त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना सांगितली. रोहित आणि रितिका यांनी १३ डिसेंबर २०१५ साली मुंबईतील ताज लँड्स या हॉटेलमध्ये लग्न केले. यावेळी क्रिकेटपटू आणि बॉलीवूडचे बरेच सेलिब्रेटी आले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times