मुंबई: करोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. क्रीडा क्षेत्रातील सर्व सामने स्थगित करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत क्रिकेटपटू सोशल मीडियावर लाइव्ह चॅट करत आहेत. या चॅट दरम्यान अनेक किस्से खेळाडू शेअर करत असतात. अशाच एका लाइव्ह चॅटमध्ये अभिनेत्री आणि वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू यांनी फक्त चर्चा केली नाही तर डान्स देखील केला. या डान्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
वाचा-
ब्रावो सोबत चॅट करताना सनी लिओनीने तिच्या चित्रपटातील गाण्यावर डान्स केला. करोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. करोना संकट जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत क्रिकेटचे अन्य सामने होण्याची शक्यता नाही.
वाचा-
बॉलिवूडमध्ये आयटम डान्ससाठी प्रसिद्ध असलेल्या सनीने लाइव्ह चॅटमध्ये डान्स केला. या दोघांचा डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times