टेनिस विश्वातील दिग्गज खेळाडूंपैकी एक म्हणजेच राफेल नदाल. पण नदालला २०१५ साली विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पराभूत करत डस्टिन ब्राऊन या खेळाडूने सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. आता करोना व्हायरसच्या काळातही टेनिस खेळत त्याने पुन्हा एका टेनिस विश्वाला आपण कशालाही घाबरत नाही, हे दाखवून दिले आहे. मार्च महिन्यापासून टेनिसच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही स्पर्धा नेमकी कशी खेळवण्यात आली, याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे.
सध्याच्या घडीला टेनिस विश्वातील मानाच्या काही स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ब्राऊन नेमका कोणत्या स्पर्धेत खेळला, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. ब्राऊन यावेळी मास्क वापरून मैदानात उतरला होता. एका प्रदर्शनीय सामन्यात खेळण्यासाठी ब्राऊन सज्ज झाला होता. करोना व्हायरसच्या काळात हा सामना कसा खेळवण्यात आला होता, याची उत्सुकता चाहत्यांनाही आहे.
सामना कसा खेळवण्यात आला…या सामन्यात एकही प्रेक्षक मैदानात नव्हता. त्याचबरोबर एकही बॉलबॉय नव्हता. फक्त दोन खेळाडू आणि एक पंच यावेळी मैदानात उपस्थित होते. मैदानात हात मिळवण्यावर बंदी होती. त्याचबरोबर टॉवेल, पाण्याची बॉटल, फळं हे सर्व खेळाडूंनी मैदानात आणले होते आणि त्याचा वापरही तेच करत होते. त्यांना या साऱ्या गोष्टी आणून द्यायला कोणीही मैदानात उपलब्ध नव्हते.
या सामन्यानंतर ब्राऊन म्हणाला की, ” दोन आठवड्यांपूर्वी असा काही सामना होईल, असे काहीच ठरवले नव्हते. सध्याच्या घडीला टेनिसच्या स्पर्धा रद्द झालेल्या आहेत. सर्व क्रीडा क्षेत्रालाच या गोष्टीचा फटका बसलेला आहे. पण या कायलात चाहत्यांसाठी किंवा प्रेरणा मिळवी, यासाठी काही गोष्टी करायला हव्यात. त्यामुळेच आम्ही हा सामना खेळायचे ठरवले होते. ”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times