बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शकिब अन हसनला कन्यारत्न झालं आहे. शकिबने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. शकिबने आपल्या मुलीचे नाव इरम हसन असे ठेवले. हे शकिबला झालेले दुसरे कन्यारत्न आहे. शकिबने आपल्या कन्याचे नाव अलायना ओब्रेन हसन, असे ठेवले होते.
शकिबने पत्नी शिशीर यांची पहिली भेट २०१० साली झाली होती. शकिब इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळायला गेला होता. त्याचबरोबर शिशीर इंग्लंडमध्ये उच्चशिक्षणासाठी गेली होती. कौंटी क्रिकेट सुरु असताना शकिब आणि शिशीर यांची भेट झाली होती. या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि २०१२ साली या दोघांनी लग्न केले होते. आता शकिब आणि शिशीर या दांम्पत्याला २ कन्या आहेत.
शकिब हा बांगलादेशचा एक दर्जेदार आणि नामांकित अष्टपैलू खेळाडू आहे. आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर शकिबने देशाला काही सामने जिंकवूनही दिले आहेत. त्याचबरोबर बांगालदेशचे कर्णधारपदही त्याने भूषवले होते. पण काही दिवसांपूर्वी बांगालदेशच्या क्रिकेट मंडळाने त्याच्यावर कारवाई केली होती. शकिब या कारवाईला सामोरा गेला होता. पण सध्या शकिब हा बांगलादेशमध्ये नसून लंडनमध्ये असल्याचे समजत आहे. या वृत्ताला महाराष्ट्र टाईम्स दुजोरा देत नाही.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times