सध्याच्या घडीला जगभरात करोनाचे थैमान सुरु आहे. त्यामुळे सर्वजण सध्याच्या घडीला चिंतेत आहेत. करोनाची ही खतरनाक विकेट आहे आणि त्यावर सामना सुरु आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे जगभरात जवळपास २ लाख ४० हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर करोनाबाधित झालेल्या लोकांची संख्या ३४ लाखांपर्यंत पोहोचली असल्याचे समजते. भारतामध्येही जवळपास एक हजार लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर करोना बाधितांची संख्या ४० हजारांवर पोहोचली आहे.

गांगुली यांनी ‘100 Hours 100 Stars’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये गांगुली यांनी सध्याच्या परिस्थितीवर आपले मत व्यक्त केले आहे. गांगुली म्हणाले की, ” सध्याची परिस्थिती म्हणजे खतरनाक खेळपट्टीवर कसोटी सामना खेळण्यासारखी आहे. चेंडू फार वेगाने येत आहे, त्याचबरोबर तो वळतही आहे. त्यामुळे फलंदाजाकडे वाचण्यासाठी फार कमी संधी आहेत. पण यावेळी कशी फलंदाजी करायची, यासाठीच मोठे कौशल्य लागते.”

गांगुली पुढे म्हणाले की, ” विकेट कशीही असली तरी फलंदाजाला नाबाद राहायचे आहे आणि धावाही बनवायच्या आहेत. हा सर्वात कठिण काळ असला तरी आपल्याला हा सामना जिंकायचा आहे. ही कठिण गोष्ट आहे, पण अशक्य नाही. ही गोष्ट शक्य करण्यासाठी सर्वांनी एकत्रित यायला हवे आणि त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.”
करोना व्हायरसमुळे झालेल्या नुकसानाबद्दल गांगुली म्हणाले की, ” करोना व्हायरसमुळे सर्वांचेच भरपूर नुकसान झाले आहे, त्याचबरोबर या नुकसानाची भरपाई होऊ शकत नाही. या महामारीला रोखले कसे जाईल, याचा विचार सुरु आहे. संपूर्ण जग या गोष्टीमुळे हैराण झालेले आहे. हा व्हायरस कसा, कुठून आला, हे माहिती नाही. त्याचबरोबर या व्हायरसशी दोन हात करायला आपण तयारही नव्हतो. पण परिस्थिती नक्कीच सुधारेल, अशी मला आशा आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here