सध्याच्या घडीला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कुठे आहे, हे कोणालाच माहिती नाही. त्याच्या बातम्याही येत नाही. पण भारताच्या एका क्रिकेटपटूला मात्र त्याची फार आठवण येत असल्याचे दिसत आहे. कारण धोनीने आतापर्यंत संघातील खेळाडूंबरोबर चांगले नाते ठेवले आहे. त्याचबरोबर धोनीने बऱ्याच खेळाडूंना मदतही केली आहे.

सध्याच्या घडीला धोनीचे चाहते चिंताग्रस्त आहेत. कारण आता धोनी भारताकडून खेळू शकणार की नाही, याचे उत्तर कोणालाही माहिती नाही. आयपीएलवर धोनीची आंतरराष्ट्रीय कारकिर्द अवलंबून असल्याचे म्हटले जात होते. पण आता आयपीएल कधी होणार, याचे उत्तरही कोणाकडे नाही. यंदा आयपीएल २९ मार्चला सुरु होणार होती. पण त्यानंतर याबाबत पहिल्या लॉकडाऊननंतर म्हणजेच १५ एप्रिलला निर्णय होईल, असे म्हटले गेले. १५ एप्रिलला आयपीएल अनिश्चित कालासाठी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता आयपीएल कधी होणार, हे कोणालाही माहिती नाही. त्यामुळेच धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार की नाही, याबाबतही संभ्रमाचे वातावरण आहे.

धोनी हा अव्वल कर्णधार होता. त्याबरोबर तो निष्णात यष्टीरक्षकही आहे. त्यामुळे फलंदाजाला कसे जाळ्यात फासायचे, हे त्याला चांगलेच माहिती होते. त्यानुसार तो गोलंदाजांना मार्गदर्शन करत असायचा. या गोष्टीचा फायदा गोलंदाजांनाही झाला. पण सध्या धोनी संघात नसल्यामुळे गोलंदाजांनाही काही प्रमाणात तोटा होत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता धोनी संघात कधी योणार आणि गोलंदाजांना कधी मार्गदर्शन करणार, याची उत्सुकता चाहत्यांनाही लागलेली आहे.

धोनीची यावेळी सर्वात जास्त आठवण येत आहे ती फिरकीपटू युजवेंद्र चहलला. कारण धोनीने चहलला बऱ्याचदा टिप्स दिल्य होत्या. त्याचबरोबर धोनी एका खास नावावे चहलला हाक मारायचा. आता ती हाक त्याला ऐकायला मिळत नाही. त्यामुळे चहलला धोनीची आठवण येत आहे. धोनी चहलला टिल्ली या नावाने हाक मारायचा. याबाबतचे एक ट्विट चहलने केले आहे आणि त्यामध्ये आपल्याला धोनीची आठवण येत असल्याचे म्हटले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here