वाचा-
भारतीय संघातील मधळ्या फळीतील धमाकेदार फलंदाज सुरेश रैनाने २००६ साली वयाच्या १८व्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केले. राहुल द्रवीडच्या नेतृत्वाखाली रैनाला खेळण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे या सामन्यात महेंद्र सिंह धोनीने ओपनिंग केली होती. पण भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. रैनाला या सामन्यात चमकण्याची संधी होती. प्रत्यक्षात तसे झाले नाही.
वाचा-
एका वृत्तपत्राशी बोलताना रैना म्हणाला, मी फार तरुण होतो आणि श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज मुथय्या मुरलीधरन तेव्हा दमदार फॉर्ममध्ये होता. त्याने पहिल्याच चेंडूवर मला बाद केले. पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात शून्यावर बाद झाल्यामुळे मला तीन रात्र झोप आली नाही.
वाचा-
मुरलीच्या पहिल्याच चेंडूवर LBW बाद झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने ५० षटकात ९ बाद २०५ धावा केल्या. अर्थात रैनाचे आंतरराष्ट्रीय पदार्पण खराब झाले तरी नंतर त्याने भारतीय संघाकडून अनेक शानदार खेळी केल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये शतक करणारा तो पहिला भारतीय खेळाडू होता.
वाचा-
रैनाने भारतीय संघाकडून १८ कसोटी, २२६ वनडे आणि ७८ टी-२० सामने खेळले आहे. तो सध्या भारतीय संघात नसला तरी आयपीएलमधील चैन्नई सुपर किंग्ज संघाकडून शानदार कामगिरी करत आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times