वाचा-
मोठ्या कालावधीपासून धोनी भारतीय संघाकडून खेळला नसल्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेकांना वाटत धोनीने निवृत्ती घ्यावी तर काही आजी-माजी क्रिकेटपटूंनी धोनीमध्ये अजून क्रिकेट शिल्लक असल्याचे मत व्यक्त केले. अशातच माजी निवड समिती प्रमुख प्रसाद म्हणाले, खुद्द धोनीला २०१९च्या वर्ल्ड कपनंतर भारतीय क्रिकेट संघाकडून खेळायचे नव्हते. त्याला कोणी संघाबाहेर केले नाही किंवा त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला नव्हता. धोनीला २०१९च्या वर्ल्ड कपनंतर ब्रेक घ्यायचा होता. पण आम्हाला माहिती नव्हते की धोनी इतका मोठा ब्रेक घेईल. तेव्हा आम्ही ऋषभ पंतला विकेटकिपर आणि फलंदाज म्हणून संधी दिली.
वाचा-
आम्ही वर्ल्ड कप झाल्यानंतर धोनीशी चर्चा केली होती. तेव्हा धोनीने स्पष्ट शब्दात सांगितले होते की मला काही काळासाठी ब्रेक घ्यायचा आहे. त्यामुळेच आम्ही पंतला संधी दिली आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतला. या एका कारणामुळे धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर असल्याचे प्रसाद यांनी एका मुलाखतीत सांगितले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times