वाचा-
शमीची पत्नी हसीनाने २०१८ मध्ये त्याच्यावर दुसऱ्या एका महिलेशी संबंध असल्याचा आरोप केला होता. तिने शमीचे आणि संबंधित महिलेचे फेसबुक चॅट सोशल मीडियावर शेअर केले होते. शमीने हे सर्व आरोप फेटाळले. त्यानंतर तो पत्नीपासून वेगळा झाला.
वाचा-
आयुष्यातील या कठीण प्रसंगानंतर देखील शमीने भारतीय संघात चांगली कामगिरी करून दाखवली. दुसरीकडे शमीची पत्नी हसीन जहा सोशल मीडियावर सक्रीय असते. हसीनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती कांटा लगा या गाण्यावर डान्स करत करताना दिसते.
हसीनाच्या या व्हिडिओला भरपूर लाइक्स मिळत आहेत. पण काही युझर्सनी हसीनाला शमीची माफी मागण्याचा सल्ला दिला आहे. काही चाहत्यांनी तुमच्या दोघांच्या वादामुळे मुलीचे भविष्य खराब होत असल्याचा सल्ला दिला.
वाचा-
हसीनाने केलेल्या आरोपानंतर शमी मानसिकदृष्ट्या खचला होता. त्यानंतर त्याने स्वत:ला सांभाळत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली.
रोहित सोबत चॅटवर बोलताना शमीने मुलीवर खुप प्रेम करत असल्याचे सांगितले. अशा कठीण काळात कुटुंबातील सदस्यांनी मोठी साथ दिल्याचे तो म्हणाला.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times