नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे सर्व खेळाडू घरीच थांबून काही ना काही गोष्टी करत आहेत. WWE मधील भारतीय कुस्तीपटू देखील सध्या घरीच आहे. खली सोशल मीडियावर सक्रीय असतो. काही दिवासांपूर्वी खलीचा क्रिकेट खेळत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता त्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

खली घरच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत क्रिकेट खेळत आहे. पण यावेळी क्रिकेटसाठी वापरण्यात येणारा नियमीत चेंडू न वापरता तो फुटबॉलच्या चेंडूने खेळत आहे. खलीने फुटबॉलचा हा चेंडू क्रिकेटच्या बॅटने हवेत मारला आणि तो हवेत उंच घराबाहेर गेला. हा व्हिडिओ टिकटॉकवर प्रचंड व्हायरल होत आहे.

वाचा-
खलीच्या या व्हिडिओला कॉमेंट्री देखील दिली आहे. फुटबॉलने षटकार मारल्यानंतर खलीने दोन्ही हात उंच करून आनंद व्यक्त केला. या व्हिडिओला आतापर्यंत १.७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच १ लाखाहून अधिक लाइक्स मिळाले. यानंतर खलीने आणखी एक व्हिडिओ टिकटॉकवर शेअर केला आहे.

वाचा-
करोनामुळे देशातील लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवण्यात आला असून या काळात रेड, ऑरेंज आणि ग्रीन असे विभाग केले आहेत. पहिला लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत होता. त्यानंतर तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आणि तो १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.

देशात करोना रुग्णांची संख्या सोमवारी १ हजार ३७३ इतकी वाढली आहे. एकूण रुग्णांची संख्या ४२ हजाराच्या वर पोहोचली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११ हजार ७०६ इतकी आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here