वाचा-
सरकारने मद्य विक्रीस पवानगी देताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास सांगितले होते. पण प्रत्यक्षात तसे झाल्याचे दिसेल नाही. या घटनेवर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार याने नाराजी व्यक्त केली. गंभीरने मद्याची खरेदी करण्यासंदर्भातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तो म्हणतो, आज दिल्लीत जीवापेक्षा मद्य जास्त महत्त्वाचे झाले आहे. लाज वाटणारे चित्र!
वाचा-
मद्य विक्रीस परवानगी दिल्यानंतर सोमवार सकाळापासून खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती. अनेक ठिकाणी मद्य खरेदी करताना दोन गटात हाणामारी झाली होती. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करण्याची वेळ आली.
वाचा-
राजधानी दिल्लीत वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत मद्य खरेदी करताना सोशल डिस्टेंसिंग न पाळल्यामुळे करोना पसरण्याचा धोका अधिक आहे. दिल्लीत गेल्या २४ तासात ४२७ नवे रुग्ण आढळले आहेत. राजधानीत करोना रुग्णांची एकूण संख्या ४ हजार ५४९ इतकी झाली आहे. तर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ६४ इतकी आहे.
गंभीरने करोना विरुद्धच्या लढ्यात आतापर्यंत मोठी मदत केली आहे. त्याने खासदार निधीतून मदत देण्याबरोबरच स्वत:चा पगार करोनासाठी दिला आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times