वाचा-
असाच एक दुसरा किस्सा आहे ज्यात भारतीय विकेटकिपर यांना चिडवण्यासाठी मियाँदादने मैदानात त्यांच्यासारख्या उड्या मारल्या होत्या. १९९२च्या वर्ल्ड कपमध्ये ४ मार्च रोजी सिडनी मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली होती. मियाँदाद फलंदाजीला आला तेव्हा किरण मोरे सातत्याने अपील करत होते. तेव्हा मियाँदादने किरन मोरे यांची नकल केली. हा घटनेचा व्हिडिओ खुप व्हायरल झाला होता.
वाचा-
१९९२च्या वर्ल्ड कपमधील त्या घटनेवर बोलताना मियाँदाद म्हणाले, मी फलंदाजीला आल्यावर किरण वारंवार अपील करत होता. तो विकेटच्या मागून कमेंट देखील करत असे. एखाद्या फलंदाजाला अशा प्रकारे त्रास देणे चुकीचे असते. मी जेव्हा भारताविरुद्ध फलंदाजीला जात तेव्हा त्यांची अवस्था खराब होत असे.
पाहा-
भारतीय खेळाडू नेहमी मला बाद करण्याचा विचार करत असे. त्यामुळे ते माझ्या मागे लागत असत. मला बाद करण्यासाठी अपील करताना किरण नेहमी उड्या मारत. तेव्हा असे वाटत असे की तो अंपायरकडे अपील नव्हे तर भीक मागत आहे. भाई दे.. दे. म्हणून मी मुद्दाम त्याची नकल केली.
पाहा-
पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत कधीच भारतावर विजय मिळवता आला नाही. पाक संघाने १९९२चा वर्ल्ड कप जिंकला असला तरी या स्पर्धेत भारताने पाकचा ४३ धावांनी पराभव केला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times