पाहा –
स्पर्धेत युवराज सिंगच्या शानदार कामगिरीमुळे भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकू शकला हे सर्वांना माहीत आहे. पण भारताचा अनुभवी क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या मते २०११चा वर्ल्ड कप जिंकू शकला आणि त्यासाठी एक खेळाडू महत्त्वाचा होता आणि तो म्हणजे होय.
वाचा-
२०११चा वर्ल्ड कप हा सचिन तेंडुलकरचा अखेरचा वर्ल्ड कप असेल असे मानले जात होते. भारतीय संघातील खेळाडू आणि चाहत्यांना सचिनला निवृत्तीच्या आधी वर्ल्ड कपच्या जेतेपदाचे गिफ्ट मिळावे असे वाटत होते. धोनीने अंतिम सामन्यात नुवान कलशेखराच्या चेंडूवर षटकार मारला आणि भारतात जल्लोष सुरू झाला. अंतिम सामन्यात सर्व खेळाडूंनी सचिनला खांद्यावर घेऊन मैदानाची फेरी मारली.
वाचा-
या विजेता संघातील सदस्य असलेल्या रैनाने सांगितले की, सचिन तेंडुलकरच्या कुलनेसमुळे भारतीय संघ वर्ल्ड कप जिंकू शकला. सचिनने प्रत्येक खेळाडूला हा विश्वास दिला की आपण सर्व जण मिळून वर्ल्ड कप जिंकू शकतो. तो एक प्रकारे संघात दुसरा कोचच होता.
या स्पर्धेत सचिनने ९ सामन्यात ४८२ धावा केल्या. ज्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च धावा होत्या. सचिनची सरासरी ५३.५५ इतकी होती तर स्ट्राइक रेट ९१.९८ इतका होता. संपूर्ण स्पर्धेत युवराजने फलंदाजी आणि गोलंदाजीत शानदार कामगिरी केली आणि त्यामुळेच तो भारतीय विजयाचा शिल्पकार ठरला यात शंका नाही. युवीला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times