Authored by Maharashtra Times | Updated: Jul 17, 2022, 7:23 PM

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि लायम लिव्हिंगस्टोन यांच्यामध्ये चांगली भागीदारी होत असल्याचे पाहायला मिळत होते. पण यावेळी पुन्हा एकदा भारताच्या मदतीला धावून आला तो हार्दिक पंड्या. कारण हार्दिक पंड्याने यावेळी दोघांनाही बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. त्यापूर्वी हार्दिक पंड्याने प्रथम जेसन रॉयला बाद करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. रॉयने यावेळी ४१ धावांची खेळी साकारली. त्यानंतर हार्दिकने बेन स्टोक्सच्या रुपात इंग्लंडला चौथा धक्का दिला

 

हार्दिक पंड्या (सौजन्य-बीसीसीआय ट्विटर)
लंडन : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याने चार विकेट्स घेत इंग्लंडच्या धावसंख्येला चांगलाच लगाम लगावला. हार्दिकला यावेळी भारताच्या अन्य गोलंदाजांची चांगली साथ मिळाली. त्यामुळेच भारताला इंग्लंडच्या धावसंख्येवर अंकुश ठेवता आला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने यावेळी अर्धशतक झळकावत भारताच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला. पण त्याला अन्य खेळाडूंकडून चांगली साथ मिळाली नाही. त्यामुळे इंग्लंडला तिसऱ्या वनडे सामन्यात भारतापुढे २६० धावांचे आव्हान ठेवता आले.

भारताने या निर्णायक सामन्यासाठी संघात एकमेव बदल केला. भारताने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला विश्रांती देत मोहम्मद सिराजला या सामन्यात संधी दिली. सिराजने या संधीचे सोने केल्याचे पाहायला मिळाले. सिराजने आपल्या पहिल्याच षटकात इंग्लंडला दोन धक्के दिली. सिराजने सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि जो रुट यांना बाद करत इंग्लंडची २ बाद १२ अशी अवस्था केली. त्यावेळीच भारताने इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले होते. त्यानंतर हार्दिक पंड्याने इंग्लंडला दोन धक्के दिले. हार्दिक पंड्याने प्रथम जेसन रॉयला बाद करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. रॉयने यावेळी ४१ धावांची खेळी साकारली. त्यानंतर हार्दिकने बेन स्टोक्सच्या रुपात इंग्लंडला चौथा धक्का दिला, हार्दिक पंड्याने त्याला २७ धावांवर बाद केले. इंग्लंडने पहिल्या २५ षटकांमध्ये चार विकेट्स गमावले. त्यामुळे २५ षटकांनंतर इंग्लंडची ४ बाद १३१ अशी स्थिती होती. त्यानंतर इंग्लंडला मोइन अलीच्या रुपात पाचवा धक्का बसला. त्यावेळी इंग्लंडच्या संघाची ५ बाद १४९ अशी अवस्था होती.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि लायम लिव्हिंगस्टोन यांच्यामध्ये चांगली भागीदारी होत असल्याचे पाहायला मिळत होते. पण यावेळी पुन्हा एकदा भारताच्या मदतीला धावून आला तो हार्दिक पंड्या. कारण हार्दिक पंड्याने यावेळी दोघांनाही बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. लिव्हिंगस्टोनच्या रुपात इंग्लंडला यावेळी सहावा धक्का बसला. त्याला २७ धावा करता आल्या. भारताने अर्धशतकवीर जोस बटलरला बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. बटलरने यावेळी तीन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६० धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडचा संघ जास्त धावा करू शकला नाही आणि त्यांना भारतापुढे मोठे आव्हान ठेवण्यात अपयश आले. युजवेंद्र चहलनेही हार्दिकला तीन विकेट्स मिळवत चांगली साथ दिली. त्यामुळे भारताला इंग्लंडला २५९ धावांत गुंडाळता आले. आता भारताच्या फलंदाजांवर सर्व मदार असणार आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : hardik pandya stopped england with a four-wicket haul, giving india a golden opportunity to win the series with a 3rd odi
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here