वाचा-
रैनाबद्दल बोलताना प्रसाद म्हणाले, २०१८-१९ मध्ये त्याची देशांतर्गत सामन्यातील कामगिरी आंतरराष्ट्रीय संघात घेण्यासारखी नव्हती. भारताकडून रैनाने २२६ वनडे, ७८ टी-२० आणि १८ कसोटी सामने खेळले आहेत. भारतीय संघाकडून त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै २०१८ मध्ये खेळला होता.
वाचा-
गेल्या वर्षी रैनावर नेदरलँडमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्जकडून पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परत येणार होता. पण करोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. रैनाला भारतीय संघात न घेण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना प्रसाद म्हणाले, व्हीव्हीएस लक्ष्मणला १९९९ साली भारतीय कसोटी संघातून बाहेर करण्यात आले होते. त्यानंतर त्याने प्रथम श्रेणीच्या सामन्यात १ हजार ४०० धावा केल्या. एका सिनिअर खेळाडूकडून हीच अपेक्षा असते.
वाचा-
रैनाने २०१८-१९ मध्ये पाच रणजी सामन्यात २४३ धावा केल्या. तर २०१९च्या आयपीएलमधील १७ सामन्यात ३८३ धावा. देशांतर्गत सामन्यात रैना फॉर्म दाखवू शकला नाही. तेव्हाच दुसऱ्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आणि संघात स्थान मिळवले.
वाचा-
स्पोटर्स टॉक मध्ये रैनाला संघा बाहेर ठेवण्याचे कारण न सांगितल्याचा आरोप निवड समितीवर करण्यात आला. त्यावर प्रसाद म्हणाले, ही खुप दुर्दैवाची बाब आहे. निवड समितीचे सदस्य रणजी सामने खेळत नाहीत हा आरोप चुकीचा आहे. बीसीसीआयचे रेकॉर्ड चेक करा. राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यांनी गेल्या ४ वर्षात किती सामने खेळले आहेत ते तुमच्या लक्षात येईल.
वाचा-
मी स्वत: रैनाला तो संघा बाहेर का आहे हे सांगितले होते. त्याला माझ्या रुममध्ये बोलवून भविष्यात संघात पुनरागमन करण्यासंदर्भात चर्चा केली होती. तेव्हा रैनाने माझ्या प्रयत्नांचे कौतुक केले. पण आता या गोष्टी ऐकल्यानंतर मला धक्का बसल्याचे प्रसाद म्हणाले.
गेल्या चार वर्षात मी लखनऊ आणि कानपूरमध्ये चार रणजी सामने पाहिले आहेत. आमची निवड समितीने चार वर्षात २०० पेक्षा अधिक रणजी सामने पाहिले आहेत. संघातून बाहेर होणाऱ्या सिनिअर खेळाडूंनी मोहिंदर अमरनाथ यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. ते २० वर्षात अनेक वेळा संघाबाहेर झाले पण पुन्हा त्यांनी स्थान मिळवले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times