सध्याच्या घडीला भारतामध्ये तिसरा लॉकडाऊन सुरु आहे. करोना व्हायरसमुळे आता हा लॉकडाऊन १७ मेपर्यंत चालणार असेल सरकारने सांगितले आहे. पण या लॉकडाऊनच्या काळातही क्रीडा मंत्रालयाने एक गोष्ट सुरु केली आहे.

देशांमधील लॉकडाऊन कधी उठणार हे कोणीही सांगू शकत नाही. सध्या करोना व्हायरसमुळे बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन आहे. या गोष्टीचा फटका क्रीडा जगतालाही बसलेला आहे. सध्याच्या घडीला सर्वच क्रीडापटू आपल्या घरीच आहेत, कारण त्यांना सराव करायलाही मिळत नाही. या परिस्थितीमध्ये काही खेळाडू आपले व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत, तर काही खेळाडूंच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर या खेळाडूंचे काही व्हिडीओ चांगलेच व्हायरल होतानाही दिसत आहे.

क्रीडा मंत्रालय दरवर्षी खेळाडूंनी पुरस्कार देत असते. यावर्षी पुरस्कार देण्यात येणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. कारण यावर्षी काही स्पर्धा रद्द झाल्या आहेत तर काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावर्षी पुरस्कार द्यायचे की नाही, यावर चर्चा सुरु होती. पण अखेर यावर्षी खेळाडूंना पुरस्कार देण्याचे क्रीडा मंत्रालयाने ठरवले आहे. या पुरस्कारासाठी ज्यांना अर्ज पाठवायचे आहेत त्यांनी ते ऑनलाइन भरावेत, असे क्रीडा मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबतच्या सुचना क्रीडा मंत्रालयाने केल्या आहेत. त्यानुसार आता खेळाडूंना हे अर्ज भरायचे आहेत. हे अर्ज जर त्यांनी वेळेत भरले तरच ते ग्राह्य धरले जातील, अन्यथा वेळेत न आलेले अर्ज फेटाळण्यात येतील. त्यासाठी आता खेळाडूंनी हे अर्ज लवकर भरावेत, अशी सुचना त्यांना करण्यात येणार आहेत.

याबाबत क्रीडा मंत्रालयाने सांगितले की, ” करोना व्हायरसमुळे खेळाडूंना पुरस्कारासाठी आम्ही अर्ज पाठवू शकत नाही. त्यामुळे आता त्यांना ऑनलाइन भरण्यासाठी सांगितले आहे. क्रीडा संघटना, संघटक आणि खेळाडूंना याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी अर्ज भरायचे आहेत. हे अर्ज भरण्यासाठी एक तारीखही ठरवण्यात आली आहे. या तारखेनंतर जर अर्ज आले तर ते स्वीकारण्यात येणार नाहीत.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here