एका सुंदरीला डेटवर घेऊन जाण्याचे भारताच्या एका क्रिकेटपटूने सोशल मीडियावर सांगितले होते. पण या सुंदरीने आता या क्रिकेटपटूला चांगलेच फटकारले आहे. त्याचबरोबर फार कमी शब्दांत त्याला खडे बोलही सुनावल्याचे पाहायला मिळाले आहे.

क्रिकेटपटू हे बऱ्याचदा बॉलीवूडमधील अभिनेत्रींबरोबर डेटिंगला जात असतात, कधीकधी मॉडेल्सबरोबर ते डेटिंगवर जातात. पण या क्रिकेटपटूने तर चक्क भारताबाहेरील एका सुंदरीला डेटिंगवर घेऊन जायचे म्हटले होते. ही सुंदरी कोणी अभिनेत्री किंवा मॉडेल नसली तरी सुंदरतेच्या बाबतीत त्यांच्यापेक्षा कमीही दिसत नाही.

प्रकरण नेमके काय…या महिला क्रिकेटपटूची चर्चा क्रीडा विश्वात होत आहे. कारण तिच्या खेळाबरोबर सौंदर्यावरही बरेच जण भाळलेले आहेत. आता ही क्रिकेट सुंदरी आहे तरी कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ही क्रिकेट सुंदरी ऑस्ट्रेलियाची आहे. गेल्या काही वर्षांमध्ये तिने नेत्रदीपक कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर तिच्या सौंदर्याची चर्चाही बऱ्याचदा होताना दिसते. ही क्रिकेट सुंदरी आहे ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिसा पेरी. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषकात पेरीने दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती.

काही दिवसांपूर्वी भारताचा सलामीवीर मुरली विजयने आपल्याला एलिसाबरोबर डिनरला जायला आवडेल, असे म्हटले होते. एलिसा ही एक सुंदर क्रिकेटपटू आहे आणि तिच्याटबरोबर काही क्षण व्यतित करायला आपल्याला आवडेल, असे मुरली विजयने म्हटले होते.

मुरलीला खडे बोल सुनावलेमुरलीने एलिसाला डिनरवर घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. पेरीने मुरलीला आता चांगलेच उत्तर दिले आहे. पेरी म्हणाली की, ” मी आशा करते की, मला डिनरला घेऊन जाणारा क्रिकेटपटू हा सध्या क्रिकेट खेळत असावा.” या कमी शब्दांत पेरीने मुरलीला चांगलेच सुनावले आहे. त्यामुळे आता मुरली पेरीच्या वाट्याला जाणार नाही, असे म्हटले जात आहे. कारण पेरीने फार कमी शब्दांत मुरलीचा अपमान केल्याचे मत क्रिकेट चाहत्यांनी व्यक्त केले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here