सध्याच्या घडीला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे तरी कुठे, हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. पण धोनी नेमका कुठे आहे, ते आता समजले आहे. धोनीचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

धोनी आता भारताकडून खेळणार की नाही, हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडलेला आहे. कारण धोनीने जूनमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर एकही सामना खेळलेला नाही. धोनी ट्वेन्टी-२० विश्वचषकात दिसेल, अशी आशा त्याच्या चाहत्यांना होती. पण आता ही आशा मावळताना दिसत आहे. कारण धोनीने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली, तर धोनीला भारतीय संघात स्थान देण्यात येणार होते. पण आता आयपीएल कधी होणार, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे धोनीचा भारताकडून खेळण्याचा मार्ग खडतर असल्याचे म्हटले जात आहे.

धोनीने आयपीएलमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली, तर त्याला ट्वेन्टी-२० विश्वचषकात संधी देण्यात येऊ शकते, असे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले होते. त्यानुसार धोनीने मार्च महिन्यापासून आयपीएलसाठी सराव सुरु केला होता. चेन्नईमध्ये जाऊन धोनीने सरावाला सुरुवातही केली होती. पण करोना व्हायरसमुळे धोनीला आपला सराव थांबावावा लागला. त्यानंतर धोनीने फिटनेससाठी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली होती. पण काही दिवसांत त्याला तेही बंद करावे लागले.

सराव बंद झाल्यावर धोनी जास्त काळ पाहायला मिळाला नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला धोनी नेमका कुठे आहे, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना होती. आता धोनीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये धोनी कुठे आहे आणि कोणाबरोबर आहे हे दिसत आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

धोनी सध्या आपल्या घरामध्येच आहे आणि कुटुंबियासमवेत वेळ व्यतित करत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी आणि त्याची मुलगी झिवा दिसत आहे. धोनी आणि झिवा त्यांच्या लाडक्या श्वानांबरोबर खेळत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. धोनी यावेळी झिवाला चेंडू कसा फेकायचा असतो, हे दाखवत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here