वाचा- आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धा : पहिल्याच दिवशी भारताची चार सुवर्णांसह बारा पदकांची कमाई
अंतिम फेरीत अविनाशने ८.३१.७५ इतका वेळ घेतला आणि तो ११व्या स्थानावर राहिला. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही त्याची दुसरी वेळ होती. याआधी २०१९ मध्ये दोहा येथे झालेल्या स्पर्धेत अविनाशने १३वे स्थान मिळवले होते. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या अविनाशला अंतिम फेरीत ती लय कायम ठेवता आली नाही. ऑक्टोबर २०१९ नंतरची ही त्याची सर्वात संथ कामगिरी ठरली.
वाचा- रोहित शर्माने विजयाचा चषक फक्त अर्शदीप सिंगच्याच हातात का दिला, जाणून घ्या खरं कारण…
फायनलमध्ये मोरोक्कोच्या सौफियाने एल बक्कलीने ८.२५.१३ वेळेसह सुवर्णपदक जिंकले. इथोपियाच्या खेळाडूने रौप्य तर केनियाच्या खेळाडूने कांस्यपदक जिंकले.
अविनाशने गेल्या वर्षी झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम गेला होता. तेव्हा अविनाशला अंतिम फेरीत पोहोचण्यात यश मिळाले नव्हते. ऑलिंपिकच्या आधी जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत देखील अविनाशने मोठे यश मिळवले होते. स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता. अविनाश हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावचा आहे. तो शेतकरी कुटुंबातील आहे. अविनाश लहानपणी ६ किलोमीटर अंतर पार करून शाळेला जात असे. वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश धावण्याचा सराव करतोय. १२चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो भारतीय लष्कराच्या ५ महार रेजिमेंटच्या सेवेत आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times