वाचा-
करोना व्हायरसमुळे स्पेनमध्ये मार्चपासून लागू करण्यात आला आहे. आता येथे व्यवसायिक खेळाडूंना सराव करण्याची सवलत देण्यात आली आहे. पण क्लब आणि स्टेडियम पुढील काही आठवडे बंदच ठेवले जाणार आहेत.
वाचा-
नोवाकने इस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यात तो टेनिस कोर्टवर दुसऱ्या एका व्यक्तीसोबत खेळताना दिसत आहे. नोवाकने लॉकडाऊनच्या काळात नियम मोडला असून आता त्याला दंड केला जाईल की शिक्षा हे पाहावे लागले.
दरम्यान Puente Romano club खेळाडूंना खेळण्याची परवानगी देण्याच्या निर्णयाबद्दल माफी मागितली आहे. स्पॅनिश टेनिस फेडरेशनने स्पष्ट केले की, ११ मे पर्यंत कोणत्याही टेनिस खेळाडूला कोर्टवर खेळण्याची परवानगी नाही. त्यांना फक्त वैयक्तीक सराव करण्याची परवानगी आहे.
वाचा-
शहरातील अन्य एका क्लबने सांगितले की, यासंदर्भात नोवाकला कल्पना देण्यात आली आहे. नियमांची अपूरी माहिती असल्यामुळे आम्ही त्यांना खेळण्याची परवानगी दिली होती.
करोना व्हायरसमुळे स्पेनमध्ये २५ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. युरोपमधील स्पेनसह अनेक देशात सध्या लॉकडाऊन आहे. या देशातील अडीच लाखापेक्षा अधिक लोक करोनामुळे बाधित झाले आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times