मुंबई: भारतीय संघाचा कर्णधार आणि त्याची पत्नी यांना बुधवारी सकाळी मोठा धक्का बसला. विराट कोहलीच्या घरातील श्वान ब्रूनोचे निधन झाले. विराटने सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर करत ही बातमी सर्वांना सांगितली. अनुष्काने देखील ब्रूनोचा फोटो शेअर करत रेस्ट इन पीस असा मेसेज लिहला.
वाचा-
विराटच्या श्वानाच्या निधनानंतर सोशल मीडियावर हा शब्द टॉप ट्रेंडमध्ये आहे. युझर्स ट्विटवर ब्रूनोला श्रद्धांजली देत आहेत. तु आमच्या सोबत ११ वर्ष होतास. पण तुझ्या सोबतचे नाते आयुष्यभराचे आहे. आज तु एका चांगल्या ठिकाणी गेला. देव तुझ्या आत्म्याला शांती देऊ देत, असा मेसजे अनुष्काने सोशल मीडियावर लिहला आहे.
वाचा-
सर्व सामान्य युझर्स नाही तर भारतीय संघातील क्रिकेटपटूंनी देखील ब्रूनोला श्रद्धांजली वाहिली आहे. विराट नेहमीच सोशल मीडियावर ब्रूनो सोबतचा फोटो शेअर करत असे.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times