मुंबई: भारतीय संघाकडून अनेक दिग्गज फलंदाज खेळले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. सौरव गांगुली, विराट कोहील, रोहित शर्मा सारखे दिग्गज फलंदाजांनी शानदार खेळी केली. करिअरमध्ये सचिनचा ८६.२३ इतका आहे. त्याने ४९ शतक झळकावली आहेत. स्ट्राइक रेटचा विचार करता सचिन अन्य फलंदाजांच्या तुलनेत मागे आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहीलचा स्ट्राइक रेट ९३.२५ इतका तर वनडेत सर्वाधिक द्विशतक करणाऱ्या रोहितचा स्ट्राइक रेट ८८.९२ इतका आहे. भारताच्या दिग्गज फलंदाजांचा स्ट्राइक रेट इतका असेल तर मग सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेले फलंदाज आहेत तरी कोण जाणून घ्या….

वाचा-
सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेल्या भारतीय फलंदाजांमध्ये आघाडीवर असलेला खेळाडू आहे हार्दिक पंड्या. हार्दिकने आतापर्यंत ५४ वनडेत ९५७ धावा केल्या आहेत. स्ट्राइक रेटचा विचार करता तो ११५.५७ इतका आहे. हार्दिकच्या नावावर ४ अर्धशतक आहेत. तर वनडेत त्याने ५४ विकेट घेतल्या आहेत.

वाचा-
स्ट्राइक रेटच्या बाबत दुसऱ्या क्रमांकावर आहे स्फोटक फलंदाज यूसुफ पठाण होय. यूसुफने भारताकडून ५७ वनडे सामने खेळले असून त्याचा स्ट्राइक रेट ११३.६० इतका आहे. त्याच्या नावावर २ शतक आणि ३ अर्धशतकांची नोंद आहे. याशिवाय त्याने ३३ विकेट देखील घेतल्या आहेत. त्यानंतर क्रमांक येतो धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागचा. भारताकडून २५१ वनडे सामने खेळलेल्या सेहवागने १०४.३३च्या स्ट्राइक रेटने ८ हजार २७३ धावा केल्या असून त्यात १५ शतक आणि ३८ अर्धशतक केली आहेत. विशेष म्हणजे सेहवागच्या नावावर ९६ विकेट देखील आहेत.

१०० पेक्षा अधिक स्ट्राइक रेट असलेला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणजे केदार जाधव होय. ७३ वनडे सामने खेळलेल्या केदारचा स्ट्राइक रेट १०१.६० इतका आहे. त्याने १ हजार ३८९ धावा केल्या असून त्यात २ शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. केदारनंतर नंबर लागतो श्रेयस अय्यरचा. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या खेळाडूचा स्ट्राइक रेट १००.८० इतका आहे. अय्यरच्या नावावर १ शतक आणि ८ अर्धशतक आहेत.

जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेला फलंदाज आहे वेस्ट इंडिजचा आंद्र रसेल होय. रसेलचा स्ट्राइक रेट १३०.२२ इतका आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलचा (१२३.३७) क्रमांक लागतो.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here