एका लीगमधील संघ विकत घेण्याच्या तयारीत बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान असल्याचे समजत आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघ हा शाहरुखच्या मालकीचा आहे. केकेआरमध्ये शाहरुखची सहमालकी आहे. केकेआरच्या मालकांमध्ये शाहरुखबरोबर जुली चावला आणि जय मेहता यांचा सहभाग आहे. केकेआरने २०१२ आणि २०१४ साली आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्यावेळी गौतम गंभीर हा संघाचा कर्णधार होता. पण गेल्या हंगामात केकेआरला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे कर्णधार असलेल्या दिनेश कार्तिकवर गदा येऊ शकते, असे चाहते म्हणत आहेत. पण यंदाचा आयपीएलचा हंगाम कधी सुरु होणार, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

आता शाहरुख लीगमधून अजून एक संघ विकत घेण्याचे ठरवत आहे. त्यामुळे आता शाहरुखच्या कंपनीचा पसारा चांगलाच वाढणार आहे. पण यामागे नेमके काय कारण आहे, याचा उलगडा मात्र होऊ शकलेला नाही.

यापूर्वी शाहरुखने कॅरेबियन क्रिकेट लीगमधील त्रिनिदाद हा संघ विकत घेतला होता. शाहरुखने या संघाची मालकी २०१५ साली घेतली होती. त्यानंतर आतापर्यंत शाहरुखकडे या संघाची मालकी कायम आहे.

शाहरुखने आता अजून एका लीगमधील संघ विकत घेण्याचे ठरवले आहे. ही लीग इंग्लंडमधील आहे. इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने ‘हंड्रेड’ नावाची लीग सुरु करण्याचे ठरवले आहे. ही लीग या वर्षापासून सुरु होणार होती. पण करोना व्हायरसमुळे ही लीग आता पुढच्या वर्षी सुरु होईल, असे म्हटले जात आहे. पण आतापासूनच या लीगमध्ये संघ विकत घेण्यासाठी शाहरुख हालचाल करत असल्याचे वृत्त मिळत आहे. जर शाहरुखने इंग्लंडच्या लीगमधील संघ विकत घेतला तर त्याच्या नावावर तीन संघ होतील. वेगवेगळ्या तीन लीगमध्ये प्रत्येकी एका संघाची मालकी शाहरुखच्या नावावर असेल, अशी मालकी असणारा शाहरुख हा एकमेव व्यक्ती असू शकतो, असे म्हटले जात आहे. पण आता तिन्ही लीगवर शाहरुखला लक्ष ठेवावे लागणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here