वाचा-
लॉकडाऊनमध्ये रवी शास्त्री यांचा परिसर ऑरेंज झोनमध्ये येतो. अशा ठिकाणी मद्य विक्री सुरू असणार. त्यामुळे मी दुकानातून बिअर घेईन आणि माझ्या दोन सहकऱ्यांसोबत पिणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाचा-
भारतीय संघातील माझे माजी सहकारी लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि रॉजर बिन्नी या दोघांसोबत मला बिअर पिण्यास आवडेल असे शास्त्री म्हणाले. सध्या लॉकडाऊनच्या काळात शास्त्री अलीबाग येथील घरात आहेत. या मुलाखतीत शास्त्री यांनी १९८५ सालच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप टुर्नामेंटमधील आठवणी सांगितल्या.
वाचा-
१९८५च्या स्पर्धेत शास्त्रींनी शानदार कामगिरी केली होती. त्यांना मालिकावीर पुरस्कार म्हणून ऑडी कार भेट मिळाली होती. तेव्हा मी ठरवले होते की काही झाले तरी पाकिस्तानच्या जावेद मियाँदाद यांना ऑडी मिळवू द्यायची नाही. सुनिल गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानचा ८ विकेटनी पराभव करून विजेतेपद मिळवले होते. जर आजचा भारतीय संघ आणि १९८५चा भारतीय संघ यांच्यात सामना झाले तर नक्कीच ती अटीतटीची लढत होईल.
वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times