कोहलीच्या नावावर काही विक्रम आहेत. यापूर्वी भारताचा माजी महान क्रिकेटपू सचिन तेंडुलकरच्या नावावर बरेच विक्रम होते. कोहलीने यापैकी काही विक्रम आता आपल्या नावावर केले आहेत. एक फलंदाज म्हणून कोहलीला रन मशिन म्हटले जाते. पण गेल्या काही सामन्यांमध्ये कोहलीच्या बॅटमधून जास्त धावा पाहायला मिळाल्या नाहीत. न्यूझीलंडच्या दौऱ्यात कोहलीला अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आल्याचे पाहायला मिळाले होते.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने बरेच सामने जिंकले आहेत. पण कोहलीला न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये जास्त विजय मिळवता आलेले नाहीत. पण भारतातील सामन्यांमध्ये कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने बरेच सामने जिंकले आहेत.
कोहलीच्या नेतृत्वाबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा म्हणाला की, ” कोहली हा एक फलंदाज म्हणून महान आहे, हे कोणीही सांगायला नको. पण एक कर्णधार म्हणून त्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. एक तो एक चांगला कर्णधार होण्याच्या मार्गावर आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times