भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने देशवासियांना काही गोष्टींचा विचार करायला सांगितला आहे. सानिया सध्या लॉकडाऊनमुळे घरीच आहे. आपला पती आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब अख्तरबरोबर ती वेळ व्यतित करत असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले होते.

सानियाने यावेळी बोलताना भारतीयांना काही गोष्टींचा विचार करायला हवा, असे सानियाला वाटते. हे सांगताना तिला भारतीयांनी आपली मानसीकता बदलायला हवी, असे म्हणायचे असावे. कारण भारतातील पालक नेमके काय करतात, त्यांचे विचार, विचारसरणी काय आहे, यावर सानियाने भाष्य केले आहे. त्याचबरोबर सानियाने भारतामध्ये कोणत्या गोष्टीत बदल घडायला हवा, याबाबतही आपले मत व्यक्त केले आहे.

सानिया म्हणाली की, ” भारतीयांनी, खासकरून मुलांच्या पालकांनी आपली मानसीकता बदलायला हवी. कारण प्रत्येक पालकांना आपला मुलगा डॉक्टर, इंजिनिअर, वकिल व्हावा असेच वाटत आहे. पण त्यांना आपला मुलगा किंवा मुलगी खेळाडू व्हावे, असे वाटत नाही. त्यामुळेच भारतामध्ये खेळाडूंना पालकांकडून जास्त प्रोत्साहन मिळत नाही. गेल्या २०-२५ वर्षांत काही बदल झाले आहेत, पण अजूनही मोठा बदल होण्यासाठी बराच कालावधी जावा लागेल.”

सानियाने २०१० साली पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकबरोबर लग्न केले होते. पण लग्नानंतरही सानिया ही जास्त काळ भारतात असते. त्याचबरोबर सानिया ही भारताची नागरीक असून टेनिसमध्येही भारताकडून खेळते. काही दिवसांपूर्वी सानियाने गूड न्यूज दिली होती. सानियाने आपल्या मुलाचे नाव इझहान, असे ठेवले होते.

सानिया पुढे म्हणाली की, ” भारतामध्ये खेळासाठी वातावरण बदललेले आहे. पण अजूनही एखाद्या मुलीने हातात रॅकेट घ्यावी, बॉक्सिंगचे ग्लोव्ज घालावेत , अशी परिस्थिती आलेली नाही. मला कुस्पीपटू बनायचे आहे, अशा सांगणाऱ्या किती मुली आहेत. त्यामुळे भारतामध्ये या गोष्टीत बदल व्हायला हवा. भारतामध्ये महिला खेळाडूंना चांगला मान मिळत आहे. क्रिकेटपटूंनंतर महिला खेळाडूंचा सन्मान केला जातो. भारतातील मासिकं किंवा पाक्षिकांमध्ये महिला खेळाडूंचे फोटो छापले जातात, ही फार चांगली गोष्ट आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here