धोनीला काही स्पर्धांमध्ये संघापासून लांब ठेवण्यात आले होते. त्याच्या जागी संघात युवा यष्टीरक्षक रिषभ पंतला संघात स्थान देण्यात आले होते. पंतला निवड समितीने भरपूर संधी दिली. पण या संधीचे सोने त्याला करता आले नाही. पंतला आता भारतीय संघातून खेळण्याची जास्त संधी मिळणार नाही, असे दिसत आहे. पंतला संघात ठेवण्यात येत आहे. पण त्याला खेळण्याची संधी देत नाहीत. त्यामुळे पंतला संघात फक्त पाणी आणायला ठेवले आहे का, असे मत भारताच्या एका क्रिकेटपटूने व्यक्त केले आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा म्हणाला की, ” धोनीच्या जागी संघात पंतला स्थान देण्यात आले. पंतला निवड समितीने बऱ्याच संधी दिल्या होत्या. पण त्याच्याकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. पंतला आता संघात तर ठेवले आहे, पण त्याला खेळवत नाही.” त्यामुळे पंतला संघाला उपयोग काय, असा सवालही नेहराने विचारला आहे. त्याचबरोबर संघात ठेवून जर संधी दिली नाही तर खेळाडूला राखीव म्हणून ठेवले जाते. त्यामुळे जेव्हा मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंना जर पाण्याची किंवा अन्य गोष्टींची गरज लागली, तर राखीव खेळाडू हे सर्व काम करत असल्याचे पाहायला मिळते.
कोहलीच्या नेतृत्वाबाबत भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा म्हणाला की, ” कोहली हा एक फलंदाज म्हणून महान आहे, हे कोणीही सांगायला नको. पण एक कर्णधार म्हणून त्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. एक तो एक चांगला कर्णधार होण्याच्या मार्गावर आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times