सरकारने ही लीग सुरु करण्याची परवानगी आज दिली आहे. त्यामुळे मे महिन्याच्या मध्यात ही लीग सुरु करण्यात येणार आहे. ही लीग सुरु करण्यासाठी सरकारने काही नियम आणि अटीही सांगितल्या आहेत. या नियम आणि अटींची पूर्तता केल्यावरच ही लीग सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे ही लीग सुरु करायची असेल तर त्यासाठी पहिल्यांदा नियम आणि अटी कशा पाळल्या जातील, याचा विचार आयोजकांना करावा लागणार आहे.
ही लीग सुरु करावी, असे क्रीडा मंत्र्यांना वाटत होते. पण यावर सरकार काय निर्णय घेते, यासाठी ते वाटत पाहत होते. बुधवारी याबाबतचा निर्णय घेण्यात येणार होता. त्यानुसार आज या लीगला सुरु करण्यासाठी सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता ही लीग सुरु करण्यात येणार आहे.
नेमके प्रकरण काय…जर्मनीतील बुंदेसलीगा ही फुटबॉची एक लीग आहे. या लीगमधील कोलोन संघातील निकोलस हॉप्टमॅन आणि इस्माइल जेकब्स यांना करोनाची बाधा झाली होती. त्याचबरोबर या संघाच्या फिजिओलाही करोना झाला होता. त्यामुळे शुक्रवारी या लीगला मोठा झटका बसला होता. पण या संघातील अन्य खेळाडूंचे अहवाल आलेले आहेत. या संघातील अन्य खेळाडूंना करोनाची बाधा झालेली नसल्याचे समोर आले असून आता ही स्पर्धा खेळवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. यासाठी जर्मनीच्या पंतप्रधानांची परवानगी घेण्यात येणार आहे. या या लीगमधील तीन खेळाडूंना जरी करोना झाला असला तरी ही स्पर्धा खेळवण्यात यावी, याचे समर्थन जर्मनीच्या क्रीडा मंत्र्यांनीही केले होते. त्यामुळे ही लीग सुरु होईल, अशी बऱ्याच जणांना आशा होती. आज अखेर यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सरकारने आता या लीगला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता ही लीग कधी सुरु होते आणि यामध्ये किती नियम पाळले जातात, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times