नवी दिल्ली: क्रिकेटच्या इतिहासात काही विक्रम असे असतात जे मोडणे जवळपास अशक्य असते. क्रिकेटमधील अशाच एका विक्रमाबद्दल आम्ही आज सांगणार आहोत. या क्रिकेटपटूने आयसीसी वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात पदार्पण केले आणि विजेतेपद देखील मिळवले. होय क्रिकेटमधील दुर्मिळ विक्रम अन्य कोणी नव्हे तर एका भारतीय खेळाडूने केला आहे.

वाचा-
भारतीय संघाने २००७चा टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपद मिळवले. भारताकडून या सामन्यात यूसुफ पठाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिली घटना होती की एखाद्या खेळाडूने वर्ल्ड फायनलमध्ये पदार्पण केले आणि विजेतेपद देखील मिळवले.

वाचा-
टी-२० वर्ल्ड कपच्या फायनल आधी भारताचा सलामीवीर विरेंद्र सेहवाग जखमी झाला. त्यामुळे यूसुफ पठाणला पदार्पणाची संधी मिळाली. यूसुफचे करिअर फार मोठे नसले तरी त्याच्या नावावर हा अनोखा विक्रम झाला आहे आणि भविष्यात चुकून एखादा खेळाडू हा विक्रम मोडू शकेल.

वाचा-
२००७च्या अंतिम सामन्यात यूसुफने सलामीवीर म्हणून ८ चेंडूत १५ धावा केल्या होत्या. यात एक चौकार आणि षटकाराचा समावेश होता. यूसुफ भारतासाठी कधीच कसोटी सामने खेळू शकला नाही. त्याने टीम इंडियाकडून ५७ वनडे सामने खेळले असून त्यात २ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय २२ टी-२० सामन्यात त्याने २३६ धावा केल्या आहेत. यूसुफचे आयपीएलमधील विक्रम शानदार आहे. त्याने १६ सामन्यात ४३५ धावा केल्या असून राजस्थान रॉयल्सला विजेतपद मिळून देण्यात खास भूमिका पार पाडली होती.

आयपीएलमध्ये यूसुफने १५ चेंडूत अर्धशतक केले होते. या स्पर्धेतील हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. पहिल्या स्थानावर केएल राहुल असून त्याने दिल्लीविरुद्ध १४ चेंडूत ५० धावा केल्या होत्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here