भारताच्या एका क्रिकेटपटूला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर चक्क मैदानात ठोसा मारणार होता, ही धक्कादायक बाब आता पुढे आली आहे. पण नेमकी अशी गंभीर गोष्ट कोणती घडली होती, जेणेकरून भारताच्या क्रिकेटपटूला चेहऱ्यावर ठोसा पडणार होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट सामना चांगलाच रंगतदार होत असतो. दोन्ही संघांत आक्रमक खेळाडू असल्याने काही वेळा मैदानात शाब्दिक हल्लेही पाहायला मिळतात. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू हे स्लेजिंग करण्यात माहीर असल्याचे म्हटले जाते. पण यावेळी मात्र भारताच्या क्रिकेटपटूने ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरला डिवचले होते.

नेमके प्रकरण तरी काय…भारत आणि ऑस्ट्रेलियात एक सामना ब्रिस्बेन येथे सुरु होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅथ्यू हेडनने शतक झळकावले होते. त्यानंतर हेडन अजून मोठी खेळी साकारण्याच्या तयारीत होता. त्यावेळी हेडनला भारताचा वेगवान गोलंदाज इरफानने पठाणने बाद केले. त्यावेळी हेडन चांगलाच वैतागलेला होता. भारतासाठी ही मोठी विकेट होती. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. यावेळी भारताचा यष्टीरक्षक पार्थिव पटेल हेडन पॅव्हेलियनमध्ये जात असताना त्याच्या बाजूला होता. त्यावेळी पटेलने हेडनला हू…हू… असे डिवचले. त्यावेळी हेडन चांगलाच भडकलेला होता. हेडन तिथून पेव्हेलियनमध्ये गेला. पण पेव्हेलियनमध्ये जाऊन बाहेर उभाच राहीला. त्यावेळी हेडन पटेलकडे रागाने पाहत होता.

सामना संपवून जेव्हा भारतीय संघ जेव्हा पेव्हेलियनमध्ये जात होता. त्यावेळी पटेलही संघाबरोबर होता. पेव्हेलिनमध्ये हेडन पटेलची वाट पाहत होता. त्यावेळी या दोघांची भेट झाली. त्यावेळी हेडन पटेलला म्हणाला की, ” जर तू पुन्हा मला डिवचले तर मी तुझ्या चेहऱ्यावर ठोसा मारेन.” त्यानंतर पटेल चांगलाच घाबरला होता. त्यावेळी पटेलने हेडनला सॉरी म्हटले आणि तिथून निघून गेला. ही घटना जेव्हा घडली होती, तेव्हा याबाबत जास्त चर्चा झाली नव्हती. पण हा प्रसंग आता हेडनने सांगितला आहे. या प्रसंगानंतर दोन्ही संघांमध्ये खेळाबाबत किती आक्रमकता होती, हे दिसून येत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here