मुंबई: क्रिकेटमधील सर्वोत्तम विकेटकिपरमध्ये महेंद्र सिंह धोनी, अॅडम गिलख्रिस्ट, कुमार संगकारा आदींचा समावेश होतो. पण तुम्ही कधी यांची विकेटकिपिंग पाहिली आहे का? इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू रसेल हे फक्त उत्तम विकेटकिपर नव्हते तर ते चांगले चित्रकार देखील आहेत.

वाचा-
जॅक रसेल यांनी इंग्लंडकडून ५४ कसोटी सामने खेळले. ते ग्लोस्टरशायर संघाकडून काऊंटी खेळायचे. काउंटी क्रिकेटमधील रसेल यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की आज रसेल यांच्या सारखे विकेटकिपर नाहीत.

वाचा-

वाचा-
अनेक वेळा असे लक्षात येते की विकेटकिपर उजव्या हाताने चेंडू वेगाने पकडतात. पण रसेल दोन्ही हाताने अतिशय चपळतेने चेंडू पकड असत. विजेच्या वेगाने ते स्टपिंग करत आणि अनेकदा सुपर वाइड चेंडू देखील उलट्या हाताने पकडत.

वाचा-
रसेल यांच्या विकेटकिपिंगचे अनेक चाहते आज देखील आहे. आजच्या क्रिकेटमध्ये हेल्मेट घालून विकेटकिपिंग करणारे खेळाडू तुम्ही पाहिले असतील. पण रसेल यांची विकेट किपिंग किती सुरेख होती हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल.

जॅक रसेल यांनी काढलेले चित्र

रसेल यांनी इंग्लंडकडून ५४ कसोटी, ४० वनडे सामन्यातून अनुक्रमे १ हजार ८९७ आणि ४२३ धावा केल्या. विशेष म्हणजे २००३ मध्ये त्यांनी दोन टी-२० सामने देखील खेळले आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here