विशाखापट्टण येथील पॉलिमर कंपनीत झालेल्या विषारी गॅस गळतीमुळे १० जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर एकूण ५००० जणांना या गॅस गळतीची बाधा झाली आहे. या घटनेनंतर क्रीडापटूही भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आणि त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहे.

या विषारी वायूच्या गळतीमुळे देशात मोठी घटना झाली आहे. या घटनेनंतर भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, भारताचा कर्णधार विराट कोहली, शिखर धवन, युवराज सिंग, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, टेनिसपटू सानिया मिर्झा यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या वाईट घटनेनंतर भारताचे क्रीडापटू एकत्र आले असून त्यांनी याबाबत दु:ख व्यक्त केले आहे. त्याचबरोबर या घटनेमघ्ये मृत झालेल्या लोकांना त्यांनी श्रद्धांजलीही वाहिली आहे.

या विषारी वायूच्या गळतीमुळे तीन किमीच्या परिणाम झाला असून आतापर्यंत एकूण ५ गावांमधील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी घडली. शेकडो बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांपैकी २० जण गंभीर आहेत. वायूगळतीची माहिती मिळताच विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी विनय चंद घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन तासांमध्ये परिस्थितीवर नियंत्रण मिळवले गेले असे चंद यांनी सांगितले. वायू गळतीच्या परिसरात लोकांना न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याबाबत कळू शकलेले नाही.

एल. जी. पॉलीमर्स इंडस्ट्रीची स्थापना सन १९६१ मध्ये हिंदुस्तान पॉलीमर्स या नावाने झाली. ही कंपनी पॉलिस्टायरेन आणि त्याचे को-पॉलिमर्सची निर्मिती करते. सन १९७८ मध्ये यूबी ग्रुपच्या मॅकडॉव्हल अॅण्ड कंपनी लिमिटेडमध्ये हिंदुस्तान पोलिमर्सचे विलिनीकरण झाले. त्यानंतर ही कंपनी एल.जी. पॉलिमर्स इंडस्ट्री या नावाने ओळखू लागली.

पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक
दरम्यान, या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जनगमोहन रेड्डी यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी या दुर्घटनेवर विचारविनिमय करण्यासाठी तातडीची बैठक आयोजित केली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here