एकाच संघातील तीन खेळाडूंना करोना व्हायरसची बाधा झाल्याचे वृत्त आता पुढे आहे. त्यामुळे या संघात सध्याच्या घडीला भयावह परिस्थिती आहे. या या खेळाडूंच्या बाबती संग काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

या संघातील खेळाडूंसह अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची यावेळी चाचणी केली. यावेळी संघाने एकूण २९३ जणांची चाचणी केली. या चाचणीमधून हे तीन खेळाडू करोना बाधित असल्याचे आता समोर आले आहे. या सर्व चाचण्या ३० एप्रिल ते ३ मे या कालावधीत करण्यात आल्या. या चाचण्यांचे अहवाल आज आले आहेत.

ब्राझील हा देश फुटॉलसाठी प्रसिद्ध आहे. या देशात बरेच नावाजलेले फुटबॉलपटू आहे. ब्राझीलमधील फ्लॅमेंगो या संघातील तीन खेळाडूंना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या संघात त्यांच्याबरोबर अजून ३५ जणं होती, पण त्यांना मात्र करोनाची बाधा झालेली नाही. संघातील कोणत्या खेळाडूंना करोना झाला आहे, यांची नावं मात्र सांगण्यात आली नाही. या तिन्ही खेळाडूंची नावं गुप्त ठेवण्यात आली आहेत.

याबाबत संघाने एक पत्रक काढले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, ” आमच्या संघातील तीन खेळाडूंना करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर उपचार करत आहोत. आम्ही या तिन्ही खेळाडूंना क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे आणि ते लवकर कसे बरे होतील, यासाठी प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर जर कोणत्याही खेळाडूंच्या कुटुंबियांना करोनाची लागण झाली तर त्यांचीही जबाबदारी आम्ही उचलणार आहोत.”

या संघाने आपला अखेरचा सामना १४ मार्चला खेळला होता. त्यानंतर त्यांनी एकही सामना खेळेलला नाही. करोना व्हायरसमुळे ब्राझीलमध्ये सर्व क्रीडा स्पर्धा थांबवण्यात आल्या. त्यामुळे हा संघ १४ मार्चनंतर एकही सामना खेळू शकला नाही. सध्याच्या घडीला ब्राझीलमध्ये १,२५, २१८ जणांना करोनाची बाधा झाली आहे. करोनाशी दोन हात करण्यासाठी ब्राझीलवासिय एकवटले आहेत आणि एकत्रितपणे ते करोनाचा सामना करत आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here