नवी दिल्ली: मैदानावर करोना व्हायरसमुळे सामने रद्द झाले असले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून खेळाडू चाहत्यांशी संवाद साधत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक क्रिकेटपटू त्यांच्यादृष्टीने सर्वोत्तम संघाची निवड करत आहेत. भारतीय संघाच्या गेल्या ६० वर्षाच्या कामगिरीचा विचार करून टाइम्स ऑफ इंडियाने सर्वोत्तम भारतीय कसोटी संघ तयार केला आहे. जाणून घेऊयात या संघात कोणाला स्थान मिळाले आहे.

वाचा-

सुनील गावस्कर- भारताचे क्लासिकल फलंदाज म्हणून सुनील गावस्कर यांचा उल्लेख केला जातो. भारतीय क्रिकेटला स्वत:च्या पायावर उभे करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. चौथ्या डावात जेव्हा भारतीय संघ अडचणीत असायचा तेव्हा गावस्कर मदतीला यायचे. ते एक तर सामना जिंकून द्यायचे किंवा वाचवायचे. गावस्कर यांनी त्यांच्या करिअरमध्ये सर्वात वेगवान आणि धोकादायक अशा गोलंदाजांचा समाना केला होता. म्हणूनच त्यांचा बेस्ट ऑफ ऑल टाइममध्ये समावेश होतो. रेकॉर्ड-१२५ सामने, १० हजार १२२ धावा, देशातील सरासरी-५०.१६, परदेशातील सरासरी-५२.११, ३४ शतकं, कालावधी-१९७१-८७.

वाचा-

विरेंद्र सेहवाग– गावस्कर एकदा म्हणाले होते की माझ्याकडे विरेंद्र सेहवागसारखा बिधास्तपणा असायला हवा होता. सेहवागने कसोटीमधील सलामीवीराची व्याख्याच बदलली. ते चेंडू सोडून नव्हे तर मारून त्याला जुना करत असे. तो आक्रमक खेळायचा पण त्याच्यात धोके कमी असायचे. रेकॉर्ड- १०४ सामने, ८ हजार ५८६ धावा, देशातील सरासरी-५४.१३, परदेशातील सरासरी- ४४.६५, २३ शतकं,कालावधी- २००१-१३.

राहुल द्रवीड- द वॉल. सर्वोत्तम तंत्र, संयम आणि धैर्य या सर्व गुणांचे मिश्रण म्हणजे राहुल होय. भारतीय संघासाठी अनेक शानदार खेळी राहुलने केल्या. त्याचा बचाव हाच आक्रमकतेचा आठवण करून द्यायचा. आक्रमक गोलंदाजीचा सामना कसा करायचा हे द्रविडला चांगले माहित होते. मग मैदान भारतीय असो की विदेशी. राहुल द्रवीडची विकेट घेणे आवघड असायचे. रेकॉर्ड- १६४ कसोटी, १३ हजार २८८, देशातील सरासरी- ५१.३५, परदेशातील सरासरी-५३.०३, ३६ शतकं, कालावधी- १९९६-२०१२

सचिन तेंडुलकर– मोठ्या कालावधीसाठी भारतीय संघाच्या फलंदाजीचा भार उचलणारा सचिन कसोटीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. परिस्थितीनुसार स्वत:मध्ये बदल करण्याचे तंत्र सचिनमध्ये होते. प्रशिक्षक गॅरी कस्टन यांनी त्याला फलंदाजीचे विश्वविद्यालय असल्याचे म्हटले होते. रेकॉर्ड- २०० कसोटी, १५ हजार ९२१ धावा, देशातील सरासरी-५२.६७, परदेशातील सरासरी-५४.७४, ५१ शतकं, कालावधी-१९८९-२०१३

विराट कोहली– धावांचा पाठलाग करताना विराटची फलंदाजी सर्वोत्तम असते. मॅच आणि विकेटनुसार स्वत:मध्ये बदल करण्यास विराटला शक्य होते. जबाबदारी आणि दबावात त्याची फलंदाजी आणखी बहरते. जबरदस्त फिटनेसमुळे त्याने मैदानावर सर्वोत्तम कामगिरी केली आहे. रेकॉर्ड- ८६ कसोटी, ७ हजार २४० धावा, देशातील सरासरी-६८.४२, परदेशातील सरासरी-४४.३६, २७ शतकं, कालावधी-२०११ ते आतापर्यंत

सौरव गांगुली- मॅच फिक्सिंगच्या अवघड काळात भारतीय संघाचे नेतृत्व गांगुलीने केले. अपेक्षाभंग झालेल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांना पुन्हा मैदानावर तो घेऊन आला. भारतीय संघ आक्रमक झाला आणि भारतीय क्रिकेट संघ झाली. स्टायलिश फलंदाज आणि गोलंदाज असलेल्या गांगुलीने या संघात स्थान मिळवले. त्यामुळेच व्हीव्हीएस लक्ष्मण या संघात स्थान मिळवू शकला नाही. रेकॉर्ड- ११३ सामने, ७ हजार २१२ धावा, देशातील सरासरी-४२.९७, परदेशातील सरासरी- ४१.५६, १६ शतकं, कालावधी-१९९६-२००८

कपील देव- भारताच्या कोणत्याही ऑल टाइम संघात कपील देव यांचा समावेश होऊ शकतो. भारतीय क्रिकेटला बदलणारा हा खेळाडू आहे. फिरकीपटूसाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय संघाची ओळख जलद गोलंदाज अशी झाली ती कपील देव यांच्या मुळे. त्यांनी पाटा विकेटवर गोलंदाजी करून यश मिळून दिले. तर फलंदाजी पोर्ट एलिझाबेथ ते चेन्नईपर्यंत धावा केल्या. स्लिपमध्ये सर्वोत्तम फिल्डर होते आणि एक सर्वोत्तम कर्णधार. रेकॉर्ड- सामने-१३१, धावा-५ हजार २४८, ८ शतक, ४३४ विकेट, गोलंदाजी सरासरी भारतात-२६.४९, परदेशातील सरासरी-३२.८५, पाच विकेट- २३ वेळा, कालावधी- १९७८-९४.

महेंद्र सिंह धोनी- धोनीची विकेटकिपिंग थोडी वेगळी आहे पण त्याच्या सारखा अन्य खेळाडू नाही. धोनी प्रत्येक विकेटवर कमाल करायचा. खालच्या क्रमांकावर फलंदाजी करून सामना फिरवण्याची त्याची क्षमता आहे. रेकॉर्ड- ९० सामने, धावा- ४ हजार ८७६, देशातील सरासरी-४५.७६, परदेशातील सरासरी-३२.८४, बळी-२९४, ६ शतकं, कालावधी-२००५-१४

अनिल कुंबळे- भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज. कुंबळे आक्रमकपणे गोलंदाजी करायचा. सचिनने कुंबळेला भारताचा सर्वात महान मॅच विनर असे म्हटले होते. फक्त भारतीय मैदानावर नाही तर परदेशात देखील कुंबळेने शानदार कामगिरी केली होती. रेकॉर्ड- १३२ सामने, ६१९ विकेट, घरच्या मैदानावर सरासरी- २४.८८, परदेशातील सरासरी- ३५.८५, ३५ वेळा एका डावात पाच विकेट, कालावधी- १९९०-२००८

इरापल्ली प्रसन्ना- महान रणनितीकार, भारतीय संघातील फिरकीटपटूमधील मुख्य नाव होय. एखाद्या फलंदाजाला बाद करण्याआधी ते दोन षटक आधीच योजना तयार करायचे. ते फलंदाजाला चुका करण्यास भाग पाडायचे. रेकॉर्ड- ४९ कसोटी, देशातील सरासरी-२६.९४, परदेशातील सरासरी-३३.८५, १० वेळा डावात पाच विकेट, कालावधी-१९६२-७८

जहीर खान- भारताचा सर्वात शानदार जलद गोलंदाज. जहीर आणि कपिल देव यांची जोडी छान जमली असती. वेग, स्विंग आणि कौशल्य- चेंडू नवा असो की जुना जहीर काहीही करू शकत असे. तो तिसऱ्या आणि चौथ्या स्पेलमध्ये फलंदाजांना बाद करायचा. धोनीने त्याला भारतीय जलद गोलंदाजांचा सचिन तेंडुलकर म्हटले होते. रेकॉर्ड- ९२ कसोटी, ३११ विकेट, देशातील सरासरी-३५.८७, विदेशातील सरासरी-३५.८७, ११ वेळा डावात ५ विकेट, कालावधी- २०००-१४

हरभजन सिंग- कसोटीत ४००हून अधिक विकेट घेणारा हरभजन स्वत:च्या बोटांवर फलंदाजांना नाचवत असे. रेकॉर्ड- १०३ सामने, ४१७ विकेट, देशातील सरासरी- २८.७६, परदेशातील सरासरी- ३८.९०, २५ वेळा डावात ५ विकेट.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here